-
अभिनेत्री अनुष्का शर्माने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भारतीय क्रिकेटर विरोट कोहलीसोबतचे खास १० फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंसह अनुष्काने विराटविषयी भरभरून लिहिलं आहे.
-
अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये विराटच्या आवडीच्या गाण्याच्या ओळी देत विराट या ओळी अक्षरशः जगल्याचंही सांगितलं. विराटच्या आवडीच्या या ओळी आणि त्यातील शब्द नात्यासह प्रत्येक गोष्टीबाबत खरे ठरतात असंही अनुष्काने नमूद केलं.
-
विशेष म्हणजे अनुष्काने जग माणसांच्या वेगवेगळ्या प्रतिमांनी भरलेलं असताना विराट धाडसीपणे तो जसा आहे तसा जगतो याविषयी लिहिलंय.
-
याशिवाय अनुष्काने गरज लागेल तेव्हा प्रोत्साहन देण्यासाठी आणि हवं तेव्हा ऐकून घेण्यासाठी विराटचे आभारही मानलेत.
-
“बरोबरीच्या दोन व्यक्तींचं लग्न तेव्हाच शक्य आहे जेव्हा दोन्ही व्यक्ती खात्रीशीर असतील. विराट मला माहिती असलेला सर्वात विश्वसनीय व्यक्ती आहे,” असंही अनुष्काने म्हटलं.
-
अनुष्का म्हणाली, “ज्या लोकांना विराट खरोखर कसा आहे हे माहिती आहेत ते भाग्यवान आहेत.”
-
प्रेम, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि आदर आपल्याला कायम मार्गदर्शन करत राहो, अशी इच्छाही तिने व्यक्त केली.
-
तसेच आपल्या दोघांचं एकमेकांमध्ये गुंतलं जाणं मला खूप आवडतं असंही तिने नमूद केलं.
-
अनुष्काने पोस्ट केलेल्या १० खास फोटोंमध्ये विराट त्यांच्या वैवाहिक आयुष्यात पार पाडत असलेल्या वेगवेगळ्या भूमिका दिसत आहेत. कुठं विराट भांडी घासताना दिसत आहे, तर कुठं तो बाळाची काळजी घेताना दिसत आहे.
-
काही फोटोंमध्ये विराट आणि अनुष्का एकमेकांसोबतचा निवांत वेळ घालवताना, फिरतानाही दिसत आहे. एकूणच अनुष्काने या फोटोंमधून जगात विराटची जी प्रतिमा आहे त्यापेक्षा तो खूप वेगळा आणि निखळ असल्याचंच सांगितलं आहे.
Photos : “कधी भांडी घासताना, तर कधी बाळाची काळजी घेताना”, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काकडून विराटसोबतचे १० खास फोटो पोस्ट
अभिनेत्री अनुष्का शर्माने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भारतीय क्रिकेटर विरोट कोहलीसोबतचे खास १० फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंसह अनुष्काने विराटविषयी भरभरून लिहिलं आहे.
Web Title: Actress anushka sharma post 10 special photos with virat kohli and daughter amid marriage anniversary pbs