-
तब्बल २१ वर्षाने भारताने ‘मिस युनिव्हर्स 2021’चा खिताब जिंकला आहे.
-
भारताची सौंदर्यवती हरनाझ संधू ‘मिस युनिव्हर्स 2021’ या मुकुटाची मानकरी ठरली.
-
यंदा मिस युनिव्हर्स ही स्पर्धा इस्त्रायलमध्ये पार पडली.
-
या स्पर्धेत ७५ हून अधिक सुंदर आणि प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता.
-
त्यातील तीन देशातील सौंदर्यवतींनी टॉप ३ मध्ये स्थान मिळवले.
-
यात दक्षिण आफ्रिका, पॅराग्वे या दोन्ही सौंदर्यवतींना मागे टाकत भारताच्या हरनाझ संधूने मिस युनिव्हर्सचा खिताब पटकावला.
-
यावेळी टॉप तीन स्पर्धकांना एक विशेष प्रश्न विचारण्यात आला होता.
-
‘दबावाचा सामना करणाऱ्या महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल?’ असा प्रश्न मिस युनिव्हर्स या स्पर्धेवेळी विचारण्यात आला होता.
-
यावर हरनाज संधूने म्हणाली, “आताच्या तरुणाईवर सर्वात मोठा दबाव म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे आहे. तुम्ही अद्वितीय आहात आणि तेच तुम्हाला सुंदर बनवते, हे समजून घ्या. तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करणे थांबवा. जगभरात घडत असलेल्या अधिक महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घ्या.”
-
“बाहेर पडा. स्वतःसाठी बोला, कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे नेते आहात, तुम्हीच तुमचा आवाज आहात. माझा स्वतःवर विश्वास होता आणि म्हणूनच मी आज इथे उभी आहे,” असे ती म्हणाली.
-
तिचे हे उत्तर ऐकून उपस्थित प्रेक्षकांसह सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
-
याच प्रश्नाच्या उत्तरामुळे हरनाजने संधू ही यंदाच्या मिस युनिव्हर्स २०२१ चा खिताबाची मानकरी ठरली.
-
२०१७ मध्ये हरनाझने मिस चंदीगडचा किताब जिंकला होता.
-
दरम्यान तब्बल २१ वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला.
-
तिच्याआधी लारा दत्ताने २००० साली मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता.
‘या’ प्रश्नाचे उत्तर देऊन हरनाझ संधू ठरली यंदाची मिस युनिव्हर्स
तिचे हे उत्तर ऐकून उपस्थित प्रेक्षकांसह सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
Web Title: One question that made india harnaaz sandhu miss universe 2021 know the winning answers nrp