• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. namrata sambherao about her pregnancy and acting career maharashtra chi hasyajatra dcp

“हास्यजत्रेच्या तिसऱ्या एपिसोडच्या शूटच्यावेळी प्रेग्नेंसी विषयी कळले आणि…”, नम्रता संभेरावने केला खुलासा

March 16, 2022 16:06 IST
Follow Us
  • छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कॉमेडी शो लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये असलेले कॉमेडी वीर हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.
    1/18

    छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कॉमेडी शो लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये असलेले कॉमेडी वीर हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.

  • 2/18

    प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री नम्रता संभेरावने शोमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. कॉमेडीचे वेगवेगळे रंग आपल्याला नम्रताने दाखवले. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नम्रताने अभिनय, कॉमेडी आणि तिचं खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

  • 3/18

    नम्रतानं शिवाजी विद्यालय काळाचौकी येथून शालेय शिक्षण पूर्ण केलं.

  • 4/18

    शाळेत असताना नम्रताने सांस्कृतिक कार्यक्रम जसे की डान्स, गायन, एकपात्री अभिनय, शुद्धलेखन सारख्या अनेक कार्यक्रमात भाग घेतला होता.

  • 5/18

    नम्रता म्हणाली, “कलेला जिथे खूप जास्त महत्व दिलं जातं, अशा वातावरणात वाढल्यामुळे मला स्वत:ला एक्सप्लोअर करण्याची संधी मिळाली. गर्ल्स स्कूलमध्ये मुली स्पर्धांमध्ये भाग घ्यायच्या त्यांना बक्षिसेही मिळायची. तिथून मला प्रेरणा मिळाली की आपणं ही करून बघायला हरकत नाही.”

  • 6/18

    पुढे नम्रता म्हणाली, “त्यानंतर मी स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरूवात केली. नवीन असताना पहिल्यांदा ‘बाजीराव मस्तानी’ मधल्या मस्तानीचा एकपात्री अभिनय परफॉर्म केला. तिथे मला दुसरं प्राईज मिळालं. तेव्हा जाणवलं खरंच आपणही अभियन क्षेत्रात काहीतरी करू शकतो. वेगवेगळी शिबिरं, स्पर्धा शोधणं सुरू झालं.”

  • 7/18

    पुढे आईने दिलेल्या पाठिंब्याविषयी नम्रता म्हणाली, “या सगळ्यात मोठा वाटा माझ्या आईचा आहे. तिचा माझ्या प्रत्येक गोष्टीला खूप पाठींबा होता. तिनं मला कधीच आडकाठी केली नाही. मला नववीपासून जिथेही कामासाठी जायचं असायचं तिथे आई माझ्यासोबत असायची.”

  • 8/18

    पुढे नम्रता म्हणाली, “आज जी काही मी इथे उभी आहे ती केवळ माझ्या आईमुळेच. सुरूवातीला पप्पा थोडे नाराज होते पण माझी कामं पाहिल्यानंतर त्यांनी मला पाठिंबा दिला.”

  • 9/18

    पुढे पैसे कमवण्याविषयी नम्रता म्हणाली, “पैसे कमवणं हा कधीच माझा उद्देश नव्हता. माझं काम लोकांना आवडायला हवं आणि त्यातून मला आणखी चार कामं मिळावीत असं वाटायचं. मग हळूहळू एकांकीका स्पर्धा आणि नाटकं तर काही व्यावसाईक नाटकांमध्येही काम केलं.”

  • 10/18

    नम्रता ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ विषयी बोलताना म्हणाली, “महाराष्ट्राचा सुपरस्टार हा शो माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. मी त्या ४ फायनलिस्टपैकी एक होते. तिथून नाव मिळालं मग कामं मिळायला लागली. खऱ्या अर्थाने करिअरची सुरूवात झाली.”

  • 11/18

    कॉडेडीच्या प्रवासाविषयी बोलताना नम्रता म्हणाली, “त्यावेळी आपल्याला कॉमेडी करता येते याची कल्पनाही नव्हती. मग फू बाई फू, कॉमेडी एक्सप्रेस, कॉमेडीची बुलेट ट्रेन, नसते उद्योग या विनोदी कार्यक्रमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या सगळ्यात सचिन मोटे आणि सचिन गोस्वामींचाही खूप मोठा वाटा आहे. गेले १२-१३ वर्ष मी त्यांच्याकडे काम करतेय. त्यांनी माझ्यातील वेगळेपण ओळखून माझ्याकडून काम करून घेतलं आणि प्रयोग करायला लावलं.”

  • 12/18

    बॉलिवूडचे कॉमेडी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जॉनी लिव्हरच्या फोन कॉल विषयी बोलताना नम्रता म्हणाली, “तुझं काम मला फार आवडलं तू चांगलं काम करतेस, हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या अभिनेत्रींमध्ये तुझं नाव आहे. असं जेव्हा मला जॉनी लिव्हर सरांनी फोन करून सांगितलं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.”

  • 13/18

    जेव्हा जॉनी लिव्हर हास्यजत्रेच्या सेटवर आले तेव्हाचा एक किस्सा नम्रताने सांगितला आहे. “त्यावेळी जॉनी लिव्हर यांनी तिला एक घड्याळ आणि सोन्याचं पेंडंट भेट म्हणून दिलं”. ही गोष्ट तिच्यासाठी कोणत्याही स्वप्नासारखी नाही असं ती म्हणाली होती.

  • 14/18

    तिच्या सासरच्यांविषयी पुढे नम्रता म्हणाली, “तू हे कर किंवा हे करू नकोस’ अशी बंधनं त्यांनी तिला घातली नाहीत. तिच्या पतीला अभिनय क्षेत्राची आवड होती. त्यामुळे त्यांनी तिला कधीच अडवलं नाही. सासूनंही वेळोवेळी पाठिंबा दिला.”

  • 15/18

    पुढे नम्रताने प्रेग्नेंसी विषयी सांगितले, “आम्हाला वाटलं तेव्हा आम्ही चान्स घेतला. फक्त एकदाच त्यांनी मला सांगितलं होतं की, तू आम्हाला बाळ दे, पुढचं सगळं आम्ही पाहू. बाळ झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांच्या आतच तू घराबाहेर पडू शकतेस.”

  • 16/18

    तिचं करिअर होण्यामागे सासरच्या लोकांचा पाठिंबा होता असं तिने सांगितलं. “बाळाचं अजिबात टेंशन घेऊ नकोस. त्यामुळे माझं करिअर घडण्यामागे माझ्या सर्पोटिव्ह कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. माझी आई आणि सासू या दोन बायकांचे ऋण मी आयुष्यात कधीच फेडू शकत नाही.”

  • 17/18

    हास्यजत्रा आणि प्रेग्नेंसी असा एक किस्सा सांगत नम्रता म्हणाली, “महाराष्ट्राची हास्यजत्रा सुरू शो सुरु झाला आणि दोन एपिसोड शूट करून झाले. तिसऱ्या एपिसोडच्या शूटच्या वेळी तिला कळलं की ती प्रेग्नेंट आहे. त्यावेळी तिला खूप आनंद झाला होता.”

  • 18/18

    प्रेग्नेंट असताना सोनी मराठीच्या टिमनं तिला प्रचंड सपोर्ट केलं. प्रसादही लिहिताना नमा, तूला हे जमेल का? ही मुव्हमेंट जमेल का? या गोष्टी विचारात घेऊन तिच्या पात्रासाठी लिखाण करत होता. प्रेग्नंसीत तिने सहा महिने हास्यजत्रेसाठी काम केलं. रुद्राक्ष जन्माला आल्यानंतर ३ महिन्यांनी पुन्हा तिने शुटींग सुरू केलं. हास्यजत्रेतील तिचा अभिनय, तिचं आईपण या ३ वर्षातले अनुभव आयुष्यभर स्मरणात राहतील असे आहेत, असे नम्रता म्हणाली. (All Photo Credit : Namrata Yogesh Sambherao Instagrm, Facebook and AOUSARMALAKKI PHOTOGRAPHY )

TOPICS
मनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी ड्रामाMarathi Drama

Web Title: Namrata sambherao about her pregnancy and acting career maharashtra chi hasyajatra dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.