-
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला सिनेसृष्टीत दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. तिने तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक उत्तम भूमिका साकारल्या आहेत.
-
अनेकदा विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या कंगनाचा आज (२३ मार्च) वाढदिवस आहे.
-
यानिमित्ताने तिने जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. याचे काही खास फोटो तिने शेअर केले आहेत.
-
कंगनाने नुकतंच माता वैष्णोदेवी मंदिर आणि भैरो बाबांच्या दर्शनाचे फोटो शेअर केले आहेत.
-
तिने तिच्या वाढदिवसानिमित्त जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे. यावेळी तिच्यासोबत तिची बहिण रंगोलीही उपस्थित होती.
-
यावेळी कंगनाने छान कुर्ता आणि पंजाबी लेहंगा परिधान केला होता.
-
कंगनाने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या मागे वैष्णोदेवी मातेचे मंदिर पाहायला मिळत आहे.
-
कंगनाने हे खास फोटो शेअर करत सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. यापूर्वीही अनेकदा कंगना ही वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी पोहोचली आहे.
-
या फोटोला कॅप्शन देताना ती म्हणाली, “आज माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज भगवती श्री वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. देवीच्या आणि माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने मी आयुष्याच्या नव्या वर्षात पाऊल टाकत आहे. तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल सर्वांचे आभार.”
-
दरम्यान वैष्णोदेवीच्या दर्शनानंतर कंगनाने भैरो बाबांच्या दर्शन घेतले. याचे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये एक अख्यायिका सांगितली आहे.
जय माता दी! कंगना रणौतने घेतले वैष्णोदेवीचे दर्शन, फोटो व्हायरल
याचे काही खास फोटो तिने शेअर केले आहेत.
Web Title: Kangana ranaut visits vaishno devi on 35th birthday see photos nrp