-
सध्या सोशल मीडियावर दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या KGF 2 ची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अभिनेत्री अर्चना जोइसनं त्याच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारली आहे.
-
KGF मध्ये रॉकीभाई अर्थात अभिनेता यशच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारणारी अर्चना खऱ्या आयुष्यात मात्र खूपच सुंदर दिसते.
-
एकिकडे चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असतानाच अर्चना जोइसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
-
चित्रपटात हृदय हेलावून टाकणारे जबरदस्त सीन देणारी अभिनेत्री अर्चनाचं वय अवघं २७ वर्षं आहे.
-
चित्रपटातील अर्चनाचा लुक पाहिल्यानंतर खऱ्या आयुष्यातील तिचे फोटो पाहिल्यानंतर थक्क व्हायला होतं. एवढी ती सुंदर दिसते.
-
अर्चना जोइसचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहिल्यानंतर तिच्या सौंदर्यावर कोणीही घायाळ होईल एवढी ती ग्लॅमरस आणि सुंदर आहे.
-
अर्चना जोइस ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध मॉडेल आणि नर्तिका आहे. मात्र तिला खरी ओळख केजीएफ या चित्रपटानंच दिली.
-
अर्चना जोइस एक कथ्थक डान्सर आहे. तिने अनेक स्टेज परफॉर्मन्समध्ये सहभाग घेतला आहे.
-
२७ वर्षीय अर्चना जोइस ही मूळची कर्नाटकची राहणारी आहे. सध्या ती केजीएफ २ मुळे बरीच चर्चेत आहे.
-
अर्चनाबद्दल आणखी एक गोष्ट थक्क करणारी आहे ती म्हणजे अर्चना विवाहित असून श्रेयस उथप्पा असं तिच्या पतीचं नाव आहे.
-
अर्चना सोशल मीडियावर बरीच सक्रीय असून इन्स्टाग्रामवर तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. असंख्य चाहते तिच्या एका स्माइलचे दिवाने आहेत.
-
अर्चनानं सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर केले असून अगदी पाश्चिमात्य ते भारतीय सर्वच प्रकारच्या पोशाखात तिचं सौंदर्य खुलून दिसतं. (फोटो- अर्चना जोइस इन्स्टाग्राम)
KGF च्या ‘रॉकी’ची ऑनस्क्रीन आई खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, तुम्ही पाहिलात का फोटो?
KGF मध्ये यशच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अर्चना जोइसचे फोटो व्हायरल होत आहेत.
Web Title: Kgf 2 actor yash onscreen mother archana jois glamorous photos goes viral mrj