-
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) ज्युरी हेड नदव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाबद्दल केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गोव्यात आयोजित ५३ व्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलताना नदाव लॅपिड यांनी हा चित्रपट ‘वल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ असल्याचं जाहीरपणे सांगितलं. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी “सत्य ही फार भयानक गोष्ट आहे, सत्य कोणालाही खोटं बोलायला भाग पाडू शकते,” अशी प्रतिक्रिया दिली. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दरम्यान, चित्रपटाचा वाद सुरू असतानाच आता विवेक अग्निहोत्रींच्या नव्या घराचे फोटो व्हायरल होत आहेत.
-
हे घर त्यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर घेतलं होतं. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
‘द काश्मीर फाईल्स’ हा विवेक अग्निहोत्रीच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट आहे. (फोटो – संग्रहित)
-
अवघ्या २० कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल ३४४ कोटींचा व्यवसाय केला होता. (फोटो – संग्रहित)
-
चित्रपट रिलीज झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच विवेक अग्निहोत्रीने मुंबईत सुमारे १८ कोटी रुपयांना एक आलिशान घर विकत घेतलंय. (Photo: parthenonhomes.in)
-
मुंबईतील वर्सोवा परिसरातील पार्थेनॉन टॉवर्स या पॉश सोसायटीमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी नवीन घर घेतलंय. (Photo: parthenonhomes.in)
-
विवेक अग्निहोत्रीचा हा आलिशान फ्लॅट ३०व्या मजल्यावर आहे. (Photo: parthenonhomes.in)
-
याच इमारतीच्या ३१व्या मजल्यावर अमिताभ बच्चन यांचा १२०० स्क्वेअर फुटांचा फ्लॅट आहे. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, विवेक अग्निहोत्री यांनी २७ सप्टेंबर रोजी सुमारे १.०७ कोटी रुपये देऊन घराची नोंदणी केली होती. (Photo: parthenonhomes.in)
-
पार्थेनॉन होम्सच्या वेबसाईटवरील फोटोंवरून या फ्लॅटची भव्यता आपल्याला पाहता येते. (Photo: parthenonhomes.in)
-
विवेक अग्निहोत्रीच्या या फ्लॅटमध्ये सर्व सोई सुविधा उपलब्ध आहेत. (Photo: parthenonhomes.in)
-
फ्लॅटमध्ये खासगी थिएटरपासून ते स्विमिंग पूलपर्यंत सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. (Photo: parthenonhomes.in)
-
विवेक अग्निहोत्री यांनी २००५ मध्ये ‘चॉकलेट’ नावाचा त्यांचा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा मल्टीस्टारर चित्रपट फ्लॉप ठरला होता. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
त्यानंतर विवेकने ‘धन धना धन गोल’, ‘हेट स्टोरी’, ‘बुद्धा इन ए ट्रॅफिक’ आणि ‘जुनूनियत’ सारखे चित्रपट बनवले.(फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
२०१९ मध्ये विवेक अग्निहोत्रींच्या ‘द ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटाने दोन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
‘The Kashmir Files’च्या प्रदर्शनानंतर दिग्दर्शकाने बिग बींच्या शेजारी घेतलं आलिशान घर, मोजले तब्बल ‘इतके’ कोटी
‘The Kashmir Files’च्या प्रदर्शनानंतर दिग्दर्शकाने तब्बल ‘इतक्या’ कोटींमध्ये घेतलं आलिशान घर, Photos व्हायरल
Web Title: The kashmir files iffi israeli filmmaker controversy see inside photos of director vivek agnihotri new house versova bought for 18 crore hrc