-
विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते.
-
मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली.
-
त्यासोबत त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
अशोक सराफ यांना सिनेसृष्टीत काम करत असताना अनेक चांगले-वाईट अनुभव आले आहेत.
-
हे अनुभव त्यांनी त्यांच्या ‘बहुरूपी’ या पुस्तकात लिहिले आहेत.
-
त्यातील एक अनुभव हा त्यांचा मुलगा अनिकेत लहान असतानाचा आहे.
-
जेव्हा त्यांच्या खिशात पैसे असूनही ते मुलासाठी दूध घेऊ शकले नव्हते.
-
अशोक यांच्याशी लग्न झाल्यानंतर निवेदिता यांनी आपला संपूर्ण वेळ मुलासाठी आणि घरासाठी देण्याचा निर्णय घेतला.
-
त्यांचा मुलगा अनिकेत लहान असताना ते तिघेही एकदा कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी निघाले होते.
-
त्यावेळी अनिकेत फार लहान होता. ते ट्रेनने प्रवास करत होते.
-
तिथून परत येत असताना एका स्टेशनवर अनिकेत खूप रडू लागला.
-
त्यांच्या जवळ असलेलं दूध नासलेलं होतं.
-
त्यामुळे अशोक यांनी ती बाटली घेतली आणि कुठे दूध मिळतंय का हे पाहण्यासाठी ते ट्रेनमधून खाली उतरले.
-
ट्रेन स्टेशनवरून सुटेल अशी भीती त्यांना होती.
-
पण तरीही मुलासाठी ते पाच ट्रॅक ओलांडून बाहेर रस्त्यावर गेले.
-
मात्र बाहेर कुठेच त्यांना दुकान दिसलं नाही.
-
शेवटी रिकामी बाटली घेऊन ते परत आले.
-
मग रडत असलेल्या अनिकेतला त्यांनी ग्लुकोजचं बिस्कीट पाण्यात बुडवून खाऊ घातलं.
-
त्यावेळी अशोक सराफ यांच्या खिशात चाळीस हजार रुपये होते.
-
मात्र इतके पैसे असूनही आपण मुलासाठी दूध घेऊ शकलो नाही ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली.
-
त्यावेळी मला पैसाच सगळं काही नसतो हे त्या घटनेनं शिकवलं.
-
हा माझ्या आयुष्याने मला शिकवलेला एक धडाच होता.
-
नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्याला अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती.
-
यावेळी ‘मी स्वरा आणि ते दोघं’ या नाटकासाठी त्यांनी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवेदिता सराफ यांना स्वतःच्या हाताने पुरस्कार दिला.
“…त्यावेळी आम्ही मुलाला बिस्कीट पाण्यात बुडवून खायला दिलं होतं”, अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
“पैसाच सगळं काही नसतो हे त्या घटनेनं शिकवलं.”
Web Title: Marathi actor ashok saraf reveled the story to buy milk for son during travel nrp