-
बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांची जोडी नेहमीच चर्चेत असते.
-
‘आयफा २०२३’ पुरस्कार सोहळ्याला रितेश-जिनिलीयाने हजेरी लावली होती. यावेळी जिनिलीयाच्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
-
पुरस्कार सोहळ्यासाठी जिनिलीयाने खास काळ्या रंगाची साडी नेसून त्यावर मोठे कानातले घातले होते. रितेशने याउलट पांढऱ्या रंगाचा कोट घातला होता.
-
परदेशात संपन्न झालेल्या ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यामध्ये रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटाला प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला.
-
या वेळी जिनिलीयाच्या लुकने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. काळ्या साडीत ती अतिशय सुंदर दिसत होती.
-
जिनिलीयाने ‘आयफा २०२३’ पुरस्कार सोहळ्याचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
जिनिलीयाच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी “वहिनीसाहेब एकदम सुंदर”, “वहिनी नेहमीच सुंदर दिसतात” अशा कमेंट केल्या आहेत.
-
जिनिलीयाने शेअर केलेल्या फोटोंवर अमृता खानविलकरने सुद्धा “बापरे खूपच सुंदर…” अशी कमेंट करीत तिचे कौतुक केले आहे.
-
‘आयफा’ पुरस्कार स्वीकारताना ‘वेड’ चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल रितेश-जिनिलीयाने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
IIFA पुरस्कार सोहळ्यात जिनिलीया देशमुखचा ग्लॅमरस अंदाज; नेटकरी म्हणतात, “वहिनीसाहेब एकदम…”
IIFA पुरस्कार सोहळ्यात जिनिलीया-रितेशच्या ‘वेड’ चित्रपटाचा सन्मान
Web Title: Genelia deshmukh looks glamorous at iifa awards received award for marathi film ved sva 00