-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायमच चर्चेत असतात.
-
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
-
पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करताना अमृता फडणवीस यांनी निसर्गाच्या सानिध्यातील त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
फोटोंना कॅप्शन देत अमृता फडणवीस लिहितात, “काही लोक मानवनिर्मित जगात हरवतात, तर काही स्वत:ला शोधण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जातात, आपल्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी पर्यावरणावर प्रेम करून त्याचे संरक्षण करा.”
-
अमृता फडणवीस यांनी पर्यावरणदिनी शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
त्यांचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.
-
“आपण उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहात याचे भान ठेवा…” अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
-
तसेच एका युजरने “आरेच्या जंगलात पर्यावरण दिन साजरा करताना पर्यावरणप्रेमी आदरणीय अमृता फडणवीस” अशी कमेंट करत त्यांना टोला लगावला आहे.
-
दरम्यान, अमृता फडणवीस या पेशाने बँकर असून त्या गायिकाही आहेत. आजवर अनेक गाण्यांनी त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
“उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहात…”, नव्या फोटोशूटमुळे अमृता फडणवीस ट्रोल, नेटकरी म्हणाले…
पर्यावरण दिनानिमित्त शेअर केलेल्या फोटोंमुळे अमृता फडणवीस ट्रोल
Web Title: Deputy chief minister devendra fadnavis wife amrita fadnavis trolled for photos shared on environment day sva 00