• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. late actor ravindra mahajani was living separately for 20 years reveals gashmeer mahajani hrc

“ते २० वर्षांपासून वेगळे राहायचे”, वडील रवींद्र महाजनींबद्दल लेक गश्मीरचा खुलासा; कारण सांगत म्हणाला, “त्यांच्याशी आमचं नातं…”

रवींद्र महाजनी एकटे का राहायचे, गश्मीर महाजनीने सांगितलं कारण

Updated: August 26, 2023 10:11 IST
Follow Us
  • gashmeer mahajani on father ravindra mahajani death 12
    1/24

    ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह १५ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील एका फ्लॅटमध्ये आढळला होता.

  • 2/24

    ते त्या घरात तीन दिवस मृतावस्थेत पडून होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.

  • 3/24

    घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं.

  • 4/24

    रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरला खूप ट्रोल करण्यात आलं.

  • 5/24

    वडील एकटेच राहत होते, त्यांच्या निधनाबद्दल मुलालाही दोन दिवस माहीत नव्हतं, त्यामुळे त्याच्यावर टीका झाली.

  • 6/24

    आता त्याबद्दल गश्मीरने ‘इ-टाइम्स’शी बोलताना उत्तर दिलं.

  • 7/24

    प्रत्येक व्यक्तीच्या दोन बाजू असतात. प्रत्येकाला आपण परफेक्ट असावं अशी इच्छा असते, परंतु कोणीही परफेक्ट नसतं. मीही नाही आणि माझे वडीलही नाही. – गश्मीर महाजनी

  • 8/24

    आम्ही त्यांना एका लहानशा अपार्टमेंटमध्ये एकटं सोडून दिलं होतं आणि आम्ही ऐशोआरामाचे जीवन जगत आहोत, असं म्हटलं गेलं. – गश्मीर महाजनी

  • 9/24

    पण मला फक्त हेच सांगायचं आहे की त्यांनी गेल्या २० वर्षांपासून वेगळे राहणं पसंत केलं होतं. – गश्मीर महाजनी

  • 10/24

    एक कुटुंब म्हणून आमच्याकडे त्यांचं एकटं राहणं स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. – गश्मीर महाजनी

  • 11/24

    कारण तुम्ही एखाद्याला जी गोष्ट करायची नाही ती करायला भाग पाडू शकत नाही, असं गश्मीर म्हणाला.

  • 12/24

    खरंतर आमचं नातं एकतर्फी होतं. जेव्हा त्यांना आम्हाला भेटायची इच्छा असायची, तेव्हा ते यायचे. – गश्मीर महाजनी

  • 13/24

    जेव्हा त्यांना एकटं राहू वाटायचं, तेव्हा ते निघून जायचे. – गश्मीर महाजनी

  • 14/24

    माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ते बराच काळ आमच्यासोबत राहिले होते. – गश्मीर महाजनी

  • 15/24

    ते मूडी होते आणि त्यांना एकटं राहायला आवडायचं. – गश्मीर महाजनी

  • 16/24

    त्यांना त्यांची कामं इतरांनी केलेली त्यांना आवडत नसे. त्यांच्याजवळ आम्ही केअरटेकर पाठवायचो, पण एक-दोन दिवसांत त्यांना कामावरून काढून टाकायचे. – गश्मीर महाजनी

  • 17/24

    गेल्या तीन वर्षापासून त्यांनी आम्ही, आमचे जवळचे कुटुंब आणि त्यांच्या जवळच्या मित्रांसह लोकांशी मर्यादित संपर्क ठेवण्यास सुरुवात केली होती, असं गश्मीरने सांगितलं.

  • 18/24

    अनेक कारणांमुळे आमच्यातील संबंध ताणले गेले, पण ते माझे वडील आणि माझ्या आईचे पती होते. – गश्मीर महाजनी

  • 19/24

    यामध्ये खोलवर अनेक वैयक्तिक गोष्टी, अनेक पैलू गुंतलेले आहेत, परंतु कुटुंबातील काही डार्क सिक्रेट सार्वजनिकरित्या उघड केले जाऊ नयेत. – गश्मीर महाजनी

  • 20/24

    ते इंडस्ट्रीतील सर्वात देखण्या अभिनेत्यांपैकी एक होते. – गश्मीर महाजनी

  • 21/24

    त्यांचं हास्य अप्रतिम होतं आणि मी त्यांच्याबद्दलच्या त्याच चांगल्या गोष्टी आठवू इच्छितो, असं गश्मीरने सांगितलं.

  • 22/24

    गश्मीरने ट्रोल करणाऱ्यांनाही चांगलंच सुनावलं.

  • 23/24

    हेही वाचा – “माझे वडील परफेक्ट नव्हते,” वडील रवींद्र महाजनींशी असलेल्या नात्याबद्दल गश्मीरचं वक्तव्य; म्हणाला, “आमच्यातील संबंध…”

  • 24/24

    (गश्मीर महाजनीचे सर्व फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Late actor ravindra mahajani was living separately for 20 years reveals gashmeer mahajani hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.