• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 8 thriller shows to watch on netflix if you love money heist and squid game spl

‘मनी हाईस्ट’ आणि ‘स्क्विड गेम’च्या तोडीस तोड असणाऱ्या ‘या’ ८ थ्रिलर वेब सिरीजचा नेटफ्लिक्सवर धुमाकूळ!

नेटफ्लिक्सवर थ्रिलर सिरीजची एक लांबलचक यादी आहे, परंतु काही शो असे आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. जर तुम्ही मनी हाईस्ट आणि स्क्विड गेम सारख्या सिरीजचे चाहते असाल, तर या वीकेंडला पाहण्यासाठी या ८ थ्रिलर सिरीजची यादी नक्कीच सेव्ह करा.

Updated: November 5, 2024 22:23 IST
Follow Us
  • money heist and squid game
    1/9

    जर तुम्ही मनी हाईस्ट आणि स्क्विड गेम सारख्या थ्रिलर वेब सिरीजचे चाहते असाल, तर तुम्हाला नेटफ्लिक्सवर असे आणखी बरेच शो मिळतील जे तुमचा वीकेंड अधिक मनोरंजक बनवू शकतात. येथे आम्ही तुमच्यासाठी असेच ८ थ्रिलर शो घेऊन आलो आहोत जे पाहिल्यानंतर तुम्हाला रोमांचाची अनुभूती देईल. (Still From Web Series)

  • 2/9

    Lupin
    फ्रांन्सच्या मिस्ट्री थ्रिलर ‘लुपिन’मध्ये ओमर सीने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा शो ‘मास्टर चोर आर्सेन लुपिन’च्या कथांपासून प्रेरित असाने डियोपची कथा सांगतो. यामधील रंजक कथा आणि वळणे पाहण्यासारखी आहेत. (Still From Web Series)

  • 3/9

    Elite
    ‘एलिट’ ही एक स्पॅनिश टीन ड्रामा सिरीज आहे जी प्रीमियम शाळेत प्रवेश घेतलेल्या तीन कामगार वर्गातील विद्यार्थ्यांची जडणघडण दाखवते. या शोमध्ये सामाजिक आणि रोमँटिक संवादाचेही चित्रण केले आहे, ज्यामुळे ही सिरीज तरुण प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. (Still From Web Series)

  • 4/9

    Money Heist: Korea – Joint Economic Area
    ‘Money Heist: Korea – Joint Economic Area’ ही मूळ स्पॅनिश सिरीजवर आधारित दक्षिण कोरियाची मालिका आहे. या मालिकेत, कथा एका नवीन दृष्टीकोनातून सादर केली गेली आहे, जिथे एक मास्टरमाइंड आणि त्याच्या गटातील सदस्य बँक लुटण्याचा कट आखतात. (Still From Web Series)

  • 5/9

    Ozark
    ‘ओझार्क’ एक अमेरिकन क्राईम ड्रामा आहे ज्यात जेसन बेटमन मार्टी बायर्डच्या भूमिकेत आहे. कथा एका आर्थिक नियोजकाची आहे जो त्याच्या कुटुंबाला नवीन ठिकाणी हलवतो आणि मेक्सिकन ड्रग कार्टेलसह पैशाची लाँड्रिंग करण्यात अडकतो. (Still From Web Series)

  • 6/9

    Sky Rojo
    स्पॅनिश ब्लॅक कॉमेडी ‘स्काय रोजो’ तीन सेक्स वर्कर्सची कथा आहे जे त्यांच्या बॉसपासून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. हा शो केवळ मनोरंजन करणारा नाही तर वेश्याव्यवसायाचे कठोर वास्तवही दाखवतो. (Still From Web Series)

  • 7/9

    The Kill Point
    ‘द किल पॉइंट’ ही एक अमेरिकन टेलिव्हिजन सिरीज आहे जी इराकमधून परतलेल्या अमेरिकन सैनिकांवर आधारित आहे. ही कथा सागरी सैनिकांच्या एका गटाचे वास्तव दाखवते, जी बँक लुटण्याची योजना आखतात. थरारक कथा आणि जबरदस्त ॲक्शनने ही सिरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवते. (Still From Web Series)

  • 8/9

    White Lines
    ‘व्हाइट लाइन्स’ ही एक ब्रिटिश-स्पॅनिश रहस्यमय थ्रिलर सिरीज आहे जी दोन टाइमलाइनमध्ये दाखवण्यात आली आहे. कथा जॉयभोवती फिरते, जो त्याचा भाऊ एक्सेलच्या रहस्यमय मृत्यूची चौकशी करण्यासाठी त्याच्या जुन्या मित्रांना भेटतो. (Still From Web Series)

  • 9/9

    Heist
    ‘Heist’ ही एक डॉक्यूमेंट्री आहे जी तीन खऱ्या गुन्ह्यांच्या कथा सांगते. या सिरीजमध्ये गुन्हेगारांच्या अनोख्या आणि मनोरंजक कथा दाखवल्या गेल्या आहेत. ज्यांनी चतुराईने त्यांचे गुन्हे केले. (Still From Web Series)
    हेही पाहा – बीफ आणि चिकनशिवाय दुबईचे शेख ताकदीसाठी ‘या’ प्राण्याचे मांस जास्त खातात

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: 8 thriller shows to watch on netflix if you love money heist and squid game spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.