• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. these 7 new web series releasing on ott platforms first week of july 2025 svk

जुलैच्या पहिल्या आठवड्यातच OTT वर धमाका! ‘या’ ७ नवीन वेब सीरिज होणार प्रदर्शित

जुलैच्या पहिल्या आठवड्यात OTT विश्वात धमाका होणार आहे! Heads of State, The Old Guard 2, The Sandman Season 2, कालीधर लापता, The Hunt, The Good Wife व Uppu Kappurambu या सात बहुप्रतीक्षित वेब सीरिज विविध प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत.

Updated: July 11, 2025 15:12 IST
Follow Us
  • web series
    1/9

    जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची जबरदस्त मेजवानी मिळणार आहे. अ‍ॅक्शन, थ्रिलर, राजकीय नाट्य, कोर्टरूम ड्रामा व गूढ कथा यांचा सरसकट अनुभव देणाऱ्या सात नव्या वेब सीरिज विविध OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. या मालिकांमध्ये बॉलीवूडसह हॉलीवूडमधील मोठे चेहरे झळकणार असून, अनेक सीरिज सत्य घटनांवर आधारित आहेत.

  • 2/9

    हेड्स ऑफ स्टेटस (Heads of State)
    रिलीज डेट : २ जुलै २०२५
    ओटीटी प्लॅटफॉर्म : Prime Video
    अॅक्शन-कॉमेडी शैलीतील ही हॉलीवूड सीरिज दोन राष्ट्रप्रमुखांच्या गुप्त मिशनवर आधारित आहे. त्यात इद्रिस एल्बा, जॉन सिना व प्रियांका चोप्रा जोनस हे प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. मिशन-इम्पॉसिबल शैलीचा अनुभव देणारी ही सीरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, अशी अपेक्षा आहे.

  • 3/9

    गुड वाइफ (The Good Wife – Indian Adaptation)
    रिलीज डेट : ४ जुलै २०२५
    OTT प्लॅटफॉर्म : Disney+ Hotstar
    ‘गुड वाइफ’ ही अमेरिकन न्यायालयीन नाट्याचे तमील रूपांतर आहे. या मालिकेत प्रियामणी एका गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे, जी पतीवर घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर पुन्हा वकील म्हणून कोर्टात परतते. तिच्यासोबत संपत राजदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. कौटुंबिक संघर्ष आणि कायदेशीर लढाई यांचं समांतर चित्रण या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.

  • 4/9

    द सँडमॅन : सीजन २ – व्हॉल्यूम (The Sandman : Season 2 – Volume 1)
    रिलीज डेट : ३ जुलै २०२५
    ओटीटी प्लॅटफॉर्म : Netflix
    DC कॉमिक्सवर आधारित ही सीरिज तिच्या दुसऱ्या पर्वात आणखी गूढ आणि कल्पनारम्य बनली आहे. टॉम स्टर्रीज (Dream), ग्वेंडोलिन क्रिस्टी (Lucifer) व किर्बी हॉवेल-बॅप्टिस्ट (Death) यांच्या प्रभावी भूमिका पुन्हा पाहायला मिळणार आहेत. व्हॉल्यूम २ – २४ जुलै, तर बोनस एपिसोड – ३१ जुलै रोजी येणार आहे.

  • 5/9

    द ओल्ड गार्ड २ (The Old Guard 2)
    रिलीज डेट : २ जुलै २०२५
    ओटीटी प्लॅटफॉर्म : Netflix
    नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय सुपरनॅचरल अॅक्शन सीरिज ‘द आल्ड गार्ड’चा दुसरा भाग मोठ्या थाटात परततो आहे. शार्लीज थेरॉन पुन्हा अँडीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत किकी लेन, उमा थरमन व हेन्री गोल्डिंग यांचाही समावेश आहे. अमर योद्ध्यांच्या जगात त्यांचा पुन्हा एकदा थरारक प्रवास दाखवला जाणार आहे.

  • 6/9

    उप्पू कप्पुरमबु (Uppu Kappurambu)
    रिलीज डे : 4 जुलै 2025
    OTT प्लॅटफॉर्म : Prime Video
    ही मल्याळम भाषेतील ग्रामीण पार्श्वभूमीतली विनोदी-भावनिक मालिका आहे. कीर्ती सुरेश, सुहास, बाबू मोहन, शत्रू व तल्लुरी रामेश्वरी यांसारखे दिग्गज कलाकार यामध्ये प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. १९९० च्या दशकातील जीवनशैली, संघर्ष व कुटुंबीय नातेसंबंध यांचे जिवंत चित्रण या मालिकेमध्ये पाहायला मिळेल.

  • 7/9

    कालीधर लापता (Kaalidhar Laapata)
    रिलीज डेट : ४ जुलै २०२५
    ओटीटी प्लॅटफॉर्म : Z5
    ही भारतीय रहस्यप्रधान सीरिज एका व्यक्तीच्या अचानक गायब होण्याच्या प्रकरणावर आधारित आहे. त्यात अभिषेक बच्चन, मोहम्मद झीशान अय्यूब व दैविक बघेला हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. नाट्य आणि गुंतागुंत यांनी परिपूर्ण ही कथा भावनिक स्तरांवरदेखील प्रभाव टाकते.

  • 8/9

    द हंट : द राजीव गांधी एसासिनेशन केस (The Hunt : The Rajiv Gandhi Assassination Case)
    रिलीज डेट : ४ जुलै२०२५
    ओटीटी प्लॅटफॉर्म : Sony LIV
    भारताच्या राजकीय इतिहासातील एक अत्यंत संवेदनशील प्रकरण म्हणजे राजीव गांधी यांची हत्या. या सत्य घटनांवर आधारित ही सीरिज अमित सियाल, साहिल वैद, गिरीश शर्मा, बगवती पेरुमल व सुबोध भावे यांच्या भूमिकेतून उलगडली जाणार आहे. हे थरारक सत्य प्रेक्षकांना अंतर्मुख करून सोडणारे ठरेल.

  • 9/9

    जुलैच्या पहिल्या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्म्सवर अजब व गजब मालिकांचा पाऊस पडणार आहे. हॉलीवूडच्या हाय बजेट अॅक्शनपासून ते भारतीय वास्तवाधारित थ्रिलरपर्यंत प्रेक्षकांना विविधतेचा अनुभव घेता येणार आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: These 7 new web series releasing on ott platforms first week of july 2025 svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.