• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress harshaali malhotra telugu debut in akhanda 2 movie svk

बजरंगी भाईजानमधील मुन्नीचं तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण; हर्षाली मल्होत्रा ‘अखंड २’ चित्रपटात झळकणार…

‘बजरंगी भाईजान’फेम हर्षाली मल्होत्रा आता ‘अखंड २’ या तेलुगू चित्रपटात झळकणार आहे. मुन्नीपासून जननीपर्यंतच्या प्रवासात तिचा नवा लूक आणि अभिनय चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे.

July 7, 2025 18:37 IST
Follow Us
  • Bajrangi Bhaijaan actress | Harshali Malhotra movie Akhanda 2
    1/6

    ‘अखंड २’मध्ये हर्षाली मल्होत्रा
    ‘बजरंगी भाईजान’मधील गोंडस मुन्नी आठवतेय का? हो, तीच हर्षाली मल्होत्रा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती लवकरच नंदमुरी बालकृष्ण यांच्या बहुचर्चित ‘अखंड २’ या तेलुगू चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या कलाकारांपासून ते हर्षालीच्या पहिल्या लूकपर्यंत, सगळीकडे तिचीच चर्चा सुरू आहे.

  • 2/6

    हर्षालीचा ‘अखंड २’मधील पहिला लूक
    अलीकडेच ‘अखंड २’च्या टीमने एक मोठी घोषणा केली आहे. ‘बजरंगी भाईजान’मधील मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा आता ‘अखंड २’मध्ये ‘जननी’ ही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. निर्मात्यांनी तिचा पहिला लूकही शेअर केला आहे, ज्यात ती पारंपरिक पिवळ्या पोशाखात अतिशय सुंदर दिसते. तिचं निरागस हसू प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

  • 3/6

    हर्षाली मल्होत्रा : मुन्नी ते जननी
    चाहत्यांनी शेवटचं हर्षालीला ‘बजरंगी भाईजान’मध्ये पाहिलं होतं, जिथे ती एक मुकी पाकिस्तानी मुलगी म्हणून झळकली होती. सलमान खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत तिचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. त्यानंतर तिने ‘कुबूल है’ आणि ‘लौट आओ त्रिशा’ यांसारख्या टीव्ही शोमध्येही छोट्या भूमिका केल्या.

  • 4/6

    ‘अखंड २’ रिलीज डेट
    ‘अखंड २’ हा हर्षालीचा आगामी तेलुगू चित्रपट २५ सप्टेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट नंदमुरी बालकृष्ण यांच्या सुपरहिट ‘अखंडा’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिल्या भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं, त्यामुळे दुसऱ्या भागाबाबतही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  • 5/6

    हर्षालीचा सुरुवातीचा प्रवास
    हर्षाली मल्होत्रा हिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातून केली होती. सलमान खानसोबत तिची केमिस्ट्री आणि निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्या एकाच भूमिकेने तिला देशभरात ओळख मिळवून दिली.

  • 6/6

    बजरंगी भाईजान : एक ब्लॉकबस्टर यश
    ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान, करीना कपूर खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, शरद सक्सेना आणि अलका कौशल यांसारख्या अनेक दमदार कलाकारांनी भूमिका साकारल्या. हर्षालीचा अभिनय हा या चित्रपटाचा खास आकर्षण होता.

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Actress harshaali malhotra telugu debut in akhanda 2 movie svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.