-
‘सैयारा’ची मोहिनी अजूनही टिकून
अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या ‘सैयारा’ या चित्रपटाची प्रेमकथा प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. प्रेमात हरवून टाकणारा हा चित्रपट लोकांना खूप आवडत आहे. -
प्रेमात हरवण्यासाठी OTT हेच ठिकाण जर तुम्हालाही ‘सैयारा’सारखी हृदयस्पर्शी प्रेमकथा अनुभवायची असेल, तर OTT प्लॅटफॉर्मवर अनेक निवडक चित्रपट तुमचं मन जिंकण्यासाठी सज्ज आहेत.
-
‘आशिकी २’ :
एक शाश्वत प्रेमाची गाथा श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांची ही प्रेमकथा आजही लोकांच्या मनात घर करून आहे. ‘तुम ही हो’ हे गाणं आजही हळव्या क्षणांची आठवण करून देतं. -
‘तमाशा’ :
स्वतःला शोधण्याचा प्रवास रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट फक्त प्रेमकथा नाही, तर आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा अनुभव आहे. ( फोटो सौजन्य : Tamashaofficial/इन्स्टाग्राम) -
‘लुटेरा’ :
वेगळं; पण प्रभावी नातं रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या अभिनयाने भारलेली ही कथा एका वेगळ्या काळातील गूढ प्रेमाची झलक दाखवते. उत्कटता आणि वेदना यांचा सुरेख मिलाफ त्यात पाहायला मिळतो. -
‘मसान’ :
प्रेम आणि वास्तवाची टक्कर विकी कौशल आणि श्वेता त्रिपाठी यांच्या अभिनयातील गहिरेपण जाणवतं. ही कथा प्रेम, दुःख आणि समाजातील वास्तव यांचं संयोजन दर्शवते. -
. ‘लंचबॉक्स’
चुकीच्या दिशेने प्रवास करून आलेल्या एका डब्याची ही सुंदर गोष्ट आहे. इरफान खान आणि निमरत कौर यांच्या अभिनयाने सजलेली ही कथा आहे. त्यामध्ये चुकून पाठवलेल्या डब्यामुळे सुरू झालेलं त्यांचं नातं माणुसकी आणि प्रेमाची ऊब जाणवून देतं. -
‘रॉकस्टार’ :
संगीतात मिसळलेलं प्रेम रणबीर कपूर आणि नर्गिस फाखरी यांची ही कहाणी वेदना आणि संगीत यांचा संगम आहे. प्रेमातील अपूर्णतेचं सौंदर्य या सिनेमात दिसून येतं. -
‘डिअर जिंदगी’ :
आयुष्याकडे नव्यानं पाहण्याची संधी शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांची ही कथा केवळ प्रेमापुरती मर्यादित नाही. ती आत्मपरीक्षण, समजूत व स्वीकृती शिकवते. डिअर जिंदगी या चित्रपटातील गाणी खूप प्रसिद्ध आहेत.
‘सैयारा’ने वेडावणाऱ्यांसाठी आवर्जून पाहाव्यात अशा OTT वर ७ उत्कट प्रेमकथा
‘सैयारा’ सारखा हृदयस्पर्शी चित्रपट अजूनही प्रेक्षकांना भावत आहे. जर तुम्हाला अशाच काही प्रेमकथांचा पुन्हा आनंद घ्यायचा असेल, तर OTT वरील ‘आशिकी २’, ‘तमाशा’, ‘मसान’, ‘रॉकस्टार’सारखे चित्रपट नक्की पाहा. वाचा, अशा ७ प्रेमकथांची खास यादी…
Web Title: These 7 heart touching romantic hindi movies like saiyaara to watch on ott svk 05