-
गणेश चतुर्थीला देशभरात मोठ्या थाटामाटात घरोघरी बाप्पांचं आगमन झालं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील ‘सागर’ निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले आहेत.
-
भाजपाचे नेते आणि क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी देखील गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. त्यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी बाप्पांचं दर्शन घेतलं.
-
गिरीश महाजनांचे कुटुंबीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत…
-
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या घरी देखील गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. त्यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्र्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं.
-
मुंबई पोलिसांनी सायबर गुन्हे आणि फसवणुकीविरोधात सामाजिक जनजागृती करण्यासाठी ‘पोलिस बाप्पा‘ या एका सुंदर गीताची निर्मिती केली आहे. या गाण्याचं लोकार्पण उपमुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलं.
-
या सोहळ्यादरम्यान सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, दिग्दर्शक राहुल खंडारे आणि इतर कलावंत उपस्थित होते.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी भेट देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाप्पाचा आशिर्वाद घेतला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील उपस्थित होते.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुष्पगुच्छ देऊन देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करण्यात आलं.
-
देवेंद्र फडणवीसांनी गणेशोत्सवानिमित्त नेत्यांसोबतच कार्यकर्त्यांच्या घरी देखील हजेरी लावली. या निवासस्थानी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त सजावट करण्यात आली होती.
-
गणेशोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार, खासदारांसह सामान्य नेत्यांच्या घरी देखील हजेरी लावली.
-
मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी देवेंद्र फडणवीसांच्या ‘सागर’ या निवासस्थानी बाप्पांचे दर्शन घेतले.
-
(फोटो सौजन्य-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटर हँडलवरून)
PHOTOS: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाप्पा चरणी नतमस्तक; नेते, कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी घेतलं बाप्पांचे दर्शन
Web Title: Deputy cm devendra fadanvis visited leaders homes on the occasion of ganeshotsav