• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. symptoms of heart attack

जाणून घ्या ह्रदयविकाराच्या झटक्यावेळी नेमके काय होते?

July 28, 2016 18:17 IST
Follow Us
  • स्थूल जीवनशैली, जंक फूड, ताणतणाव, वाढती चरबी या साऱ्या गोष्टी हृदयविकारासाठी कारणीभूत ठरतात. जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा जाणून घ्या शरीरात काय बदल होतात.
    1/

    स्थूल जीवनशैली, जंक फूड, ताणतणाव, वाढती चरबी या साऱ्या गोष्टी हृदयविकारासाठी कारणीभूत ठरतात. जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा जाणून घ्या शरीरात काय बदल होतात.

  • 2/

    शरीरासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन आणि पोषक तत्व शरीराला पोहोचवण्याचे प्रमुख काम हे हृदयाचे आहे. ज्या धमन्यांमधून हा रक्तपुरवठा सुरू असतो त्या वाढत्या वयाबरोबर कमजोर होऊ लागतात.

  • 3/

    हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या या हळूहळू आकुंचन पावतात किंवा त्या काम करणे थांबवतात. यामुळे रक्तपुरवठ्याला अडथळा निर्माण होतो. हृदयविकार झटक्याची ही पहिली पायरी आहे.

  • हे होत असताना जर माणूस अधिक धावपळीचे काम करत असेल तर याचे परिणाम गंभीर होतात. शरीराला कार्य करण्यासाठी अधिक उर्जेची गरज असते. या उर्जेचा पुरवठा करण्यासाठी हृदयाची धडपड सुरू होते. पण याचवेळी रक्तपुरवठा करणा-या धमन्यांमध्ये लाल रक्त कणिका जमायला सुरूवात होते. धमन्यांतील या अडथळ्यांमुळे मग रक्त प्रवाह खंडित व्हायला सुरूवात होते.
  • 4/

    रक्त पुरवठा होण्यासाठी आलेला अडथळा तसेच ऑक्सिजनची कमी यामुळे हृदयावर परिणाम व्हायला सुरूवात हेते. ऑक्सिजन मिळवण्यासाठी हृदयाचे ठोके जलद वाढतात त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो.

  • नंतर घाम येणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे, छातीत दुखणे अशी हृदयविकारच्या झटक्याची लक्षणे दिसायला सुरूवात होते.
  • ऑक्सिजनचा पुरवठा कमी व्हायला लागला की याची माहिती हृदय मेंदूला देतो आणि त्वरित शरिरातल्या इतर अवयवांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन तो हृदयाकडे वळवला जातो याचमुळे हृदयविकाराचा झटका येण्याआधी छातीत कळ उठते. कधीकधी काही मिनिटे छातीत दुखते तर कधी हे दुखणे तासापर्यंत लांबू शकते.
  • जर हृदयविकाराचा झटका आल्यानंतर वेळेवर उपाय योजला नाही तर हळूहळू हृदयाच्या मांसपेशी मरू लागतात आणि हृदय काम करणे बंद करते. यानंतर काहीच मिनिटांत मेंदूच्या कोशिकाही मृत पाऊ लागतात.
  • हृदय विकारानंतर हृदयाचा जो हिस्सा बंद पडतो तो पुन्हा कधीच ठीक होत नाही.

Web Title: Symptoms of heart attack

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.