Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what are health benefits of coriander asy

कोथिंबीर खाल्ल्याने खरंच फायदा होतो का? १२ पॉइंट्समधून जाणून घ्या

Updated: September 10, 2021 14:25 IST
Follow Us
  • १) रोजच्या जेवणामध्ये ताज्या कोथिंबीरीची चटणी १-२ चमचे खाल्ली असता अपचन, आम्लपित्त, अन्नावरील वासना कमी होणे, पोटात गुब्बारा धरणे, अल्सर, मूळव्याध आदी विकार होत नाहीत.
    1/12

    १) रोजच्या जेवणामध्ये ताज्या कोथिंबीरीची चटणी १-२ चमचे खाल्ली असता अपचन, आम्लपित्त, अन्नावरील वासना कमी होणे, पोटात गुब्बारा धरणे, अल्सर, मूळव्याध आदी विकार होत नाहीत.

  • 2/12

    २) रोज सकाळी कोथिंबीर पाने १०-१२ व पुदिना पाने ७-८ पाण्यातून उकळून घेतल्यास शरीरातील विषारी घटक शौच व लघवीद्वारे बाहेर पडतात. तसेच शरीरातील वाईट कोलेस्ट्रेरॉलचे वाढलेले प्रमाण कमी होण्यास मदत होते.

  • 3/12

    ३) डोळ्यांची आग होणे, तसेच डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होणे. डोळे कोरडे होणे, डोळे क्षीण होणे अशा विविध डोळ्यांच्या विकारावर कोथिंबीर उपयोगी आहे. कोिथबिरीचा ताजा रस काढून त्यात ४-५ चमचे पाणी मिसळून हा रस गाळून घ्यावा व ते पाणी डोळ्यात २-३ थेंब घालावे.

  • 4/12

    ४) शरीराराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच शरीराचा थकवा जाऊन उत्साह वाढविण्यासाठी २ चमचे धणे व अर्धा इंच आलं एक ग्लास पाण्यात उकळावे व हे पाणी गूळ घालून आटवावे व तयार झालेला धण्याचा चहा प्यावा. हा चहा प्यायल्याने भूकसुद्धा वाढते

  • 5/12

    ५) अन्नपचन नीट न झाल्याने जर जुलाब होत असतील तर अशा वेळी धण्याचा ग्लासभर पाण्यात काढा करून प्यावा यामुळे जुलाब थांबतात.

  • 6/12

    ६) आम्लपित्तामुळे घशामध्ये व छातीमध्ये जळजळ होत असेल व घशासी आंबटपाणी येत असेल तर एक चमचा धणेपूड व एक चमचा खडीसाखर (बारीक केलेली) यांचे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घ्यावे यामुळे आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.

  • 7/12

    ७) स्थूलता कमी करण्यासाठी एक चमचा धणे, एक चमचा आवळा पावडर, अर्धा इंच आलं हे मिश्रण पाण्यात उकळून ते पाणी प्यावे.

  • 8/12

    ८) हातापायांची उष्णतेमुळे जळजळ होत असेल तर एक चमचा धणे व जिरे रात्री पाण्यात भिजत घालावे व सकाळी उठल्यावर पाण्यामध्ये कुस्करून ते पाणी गाळून प्यावे.

  • 9/12

    ९) गर्भवती स्त्रियांना अनेक वेळा उलटीचा त्रास होतो. अशा वेळी धणे पूड एक चमचा व १० ग्रॅम खडीसाखर हे पाण्यामध्ये मिसळून ते पाणी थोडय़ा थोडय़ा अंतराने घोट घोट पीत राहावे.

  • 10/12

    १०) धणे सुगंधी, दीपक, पाचक, मुखशुद्धीकारक असल्यामुळे बडीशोपमध्ये मिसळून जेवणानंतर खावेत. यामुळे मुखदरुगधी दूर होते व पोटातील गॅस कमी होतो.

  • 11/12

    ११) मूत्र प्रवृत्ती होत नसेल व लघवीला आग होत असेल तर अशा वेळी ४ चमचे धणे रात्री ८ ग्लास पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी उकळावे. थंड झाल्यानंतर हे पाणी दिवसभर पीत राहावे. लघवीची जळजळ कमी होऊन मूत्रप्रवृत्ती वाढते.

  • 12/12

    १२) खोकल्यावर खात्रीशीर उपाय म्हणून धण्याचा उपयोग केला जातो. धणेपूड, सुंठ व पिपळी चूर्ण समप्रमाणात घेऊन मधातून सकाळ संध्याकाळ चाटण करावे असे केल्याने खोकला हळूहळू कमी होऊन नष्ट होतो.

Web Title: What are health benefits of coriander asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.