-
होंडा कार्स इंडिया लिमिटेडने (HCIL)बुधवारी भारतात आपली बहुप्रतिक्षित सिडान सेगमेंटमधील कार नेक्स्ट जनरेशन मॉडेलमध्ये लाँच केली.
-
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली नवीन 2020 होंडा सिटी ही कार कंपनीने लाँच केली आहे.
-
नवीन Honda City ही कार कंपनीने यावर्षी भारतीय मार्केटमध्ये लाँच केलेली तिसरी कार ठरली. यापूर्वी कंपनीने WR-V आणि BS6 Civic या कार लाँच केल्या आहेत.
-
नवीन होंडा सिटी लाँच केली असली तरीही मार्केटमध्ये जुन्या सिटीची विक्री सुरूच राहिल असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
-
होंडाने जुन्या कारच्या तुलनेत नवीन सिटीमध्ये अनेक शानदार फीचर्सचा समावेश केला आहे. शिवाय आधीच्या मॉडेलपेक्षा नवीन सिटी जास्त प्रीमियम दिसते.
-
ही नवीन सिटी कार कंपनीने V, VX आणि ZX अशा तीन व्हेरिअंट्समध्ये आणली आहे.
-
पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन प्रकारात नवीन होंडा सिटी उपलब्ध असेल.
-
नवीन होंडा सिटी जुन्या मॉडेलच्या तुलनेत आकारानेही जास्त लांब आणि रुंद आहे. या कारची लांबी 4,549mm झाली आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत लांबी 109 mm ने जास्त आहे. तर, रुंदी 1,748mm असून जुन्या मॉडेलच्या तुलनेत 53 mm जास्त रुंद आहे.
-
आकाराने मोठी असल्यामुळे कारमध्ये केबिन स्पेसही जास्त मिळतो. याशिवाय कारची उंचीही (1489 mm) आधीच्या कारपेक्षा 6 mm ने जास्त आहे. पण, व्हिलबेस आधीइतकाच (2600 mm)आहे.
-
होंडा सिटी सिडानमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, फुल LED हेडलँप, LED टेल लाइट्स, 17.7 cm चा HD फुल कलर TFT मीटर, लेनवॉच कॅमेरा आणि व्हेइकल स्टेबिलिटी असिस्ट असे फीचर्स आहेत.
-
एलेक्सा रिमोट कनेक्टिव्हिटी फीचरसह ही देशातील पहिली कनेक्टेड कार असल्याचा होंडाचा दावा आहे.
-
कारमध्ये 8 इंचाची टच स्क्रीन इन्फोटन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. ही सिस्टीम अॅपल कार प्ले आणि अँड्राइड ऑटोला सपोर्ट करते. याशिवाय इंस्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये 7 इंचाचा डिजिटल डिस्प्लेही आहे.
-
याशिवाय, की-लेस एंट्री, रिमोट स्टार्ट, इलेक्टिक सनरूफ, ऑटो पॉवर विंडो, रिअर सनशेड, स्टीअरिंग माउंटेड पॅडल शिफ्टर, ऑटो हेडलँप यांसारखे अनेक फीचर्स आहेत.
-
कंपनीने जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातच या कारसाठी प्री-बुकिंग सुरू केली होती. डीलरशिपशिवाय Honda From Home प्लॅटफॉर्मचा वापर करुन ऑनलाइन बुकिंगही करता येईल.
-
इंडियन मार्केटमध्ये या मिडसाइज सिडान कारची थेट टक्कर मारुती सुझूकी सियाज, hyundai verna, फोक्सवॅगन वेंटो, स्कोडा रॅपिड आणि टोयोटा यारिस या गाड्यांशी असेल.
-
पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन प्रकारात नवीन होंडा सिटी उपलब्ध असेल. हे दोन्ही अपडेटेड BS6 इंजिन आहेत. पेट्रोल व्हर्जनमध्ये कंपनीने 1.5 लिटर क्षमतेच्या i-VTEC 4 सिलिंडर युक्त पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे. याद्वारे 119 bhp पॉवर आणि 145Nm टॉर्क निर्माण होतं. यात 6 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशल आणि CVT ट्रांसमिशन गिअरबॉक्स आहे.
-
याशिवाय, डिझेल व्हर्जनमध्ये कंपनीने 1.5 लिटर क्षमतेच्या i-DTEC डिझेल इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन 98 bhp पॉवर आणि 200Nm टॉर्क निर्माण करतं. यात 6 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन गिअरबॉक्स आहे.
-
पेट्रोल इंजिन व्हर्जनमध्ये ही कार 17.8 किलोमीटर प्रतिलीटर आणि ऑटोमेटिक व्हेरिअंटमध्ये 18.4 किलोमीटर प्रतिलीटर इतका माइलेज देते असा कंपनीचा दावा आहे.
-
तर, डिझेल इंजिन व्हर्जनमध्ये सर्वाधिक 24.1 किलोमीटर प्रतिलीटर माइलेज मिळतो असं कंपनीने म्हटलं आहे.
-
किंमत :- नवीन होंडा सिटीच्या बेसिक व्हेरिअंटची (V) एक्स शोरुम किंमत कंपनीने 10.89 लाख रुपये ठेवली आहे. तर VX व्हेरिअंटसाठी तुम्हाला 12.19 लाख रुपये आणि टॉप व्हेरिअंटसाठी (ZX)14.64 लाख रुपये मोजावे लगतील. (सर्व फोटो – होंडा इंडिया)
प्रतीक्षा संपली! Honda City नेक्स्ट जनरेशन झाली लाँच, ह्युंडाई Verna ला देणार टक्कर
आली बहुप्रतिक्षित ‘होंडा सिटी’….
Web Title: Honda city 2020 launched at %e2%82%b910 lakh takes aim at hyundai verna 2020 get all the details sas