• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. natural headache remedies for instant relief ssj

सततच्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग करुन पाहा ‘हे’ ९ घरगुती उपाय

August 26, 2020 14:55 IST
Follow Us
    • अनेक जण सततच्या डोकेदुखीमुळे त्रस्त असतात. खरंतर प्रत्येक व्यक्तीच्या डोकेदुखीचं कारण वेगवेगळं असतं काहींना उन्हात फिरल्यावर डोकेदुखी होते. तर काहींना सतत कामाचा ताण घेतल्यामुळे डोकं दुखू लागतं. त्याचप्रमाणे काहींना मायग्रेनसारखीदेखील समस्या असते.
    • परंतु, डोकेदुखीचं कारणं जरी कोणतंही असलं तरीदेखील या काळात होणाऱ्या वेदना या प्रचंड असहाय्य करणाऱ्या असतात. त्यामुळे डोकेदुखीवर असे काही उपाय आहेत जे घरच्या घरी कोणीही करु शकतात. चला तर पाहुयात डोकेदुखीवर घरगुती उपाय.
    • आलेयुक्त चहा – अनेकांना आलं घालून केलेला चहा प्रचंड आवडतो. विशेष म्हणजे हा चहा केवळ चवीसोबतच आरोग्यासाठीदेखील तितकाच फायदेशीर आहे.आलेयुक्त चहामुळे शरीरामधील रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यास मदत होऊन वेदना कमी होते. (सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
    • पाणी प्या – अनेकदा शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे म्हणजेच डिहायड्रेशन झाल्यामुळे बरेचदा डोकेदुखी होते. त्यामुळे अचानक डोके दुखायला लागल्यास भरपूर पाणी प्यावे. कारण भरपूर पाणी प्यायल्याने सुद्दा डोकेदुखीवर मात करता येते.
    • लवंग – डोकेदुखी घालवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे लवंग. तव्यावर काही लवंगा शेकून घ्या. त्यानंतर गरम असतानाच या लवंग रुमालात बांधून घ्या. त्यानंतर या रुमालातून येणारा गरम लवंगांचाचा वास घेत राहा. यामुळे डोकेदुखीचा त्रास नक्कीच कमी होईल.
    • अॅक्युप्रेशर करा – अॅक्युप्रेशर हा अनेक आजारांवरील उपाय आहे. अंगठा आणि तर्जनी म्हणजे पहिल्या बोटाच्या मधल्या भागात असलेल्या स्थायूंवर एक मिनिटापर्यंत दाब द्या. अशाप्रकारे स्नायूवर योग्य प्रमाणात दाब दिल्यामुळे डोकेदुखीपासून सुटका होईल.
    • लिंबू पाणी – शरीरातील आम्लांचे प्रमाण कमी जास्त झाल्यावर डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे डोक दुखायला लागल्यावर लिंबू पाणी प्यावं. यात थोडंसं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालावा.
    • कलिंगड खा – डोक दुखायला लागल्यावर पाणीदार फळे खा. यात कलिंगड, द्राक्षे, खरबूज अशा फळांचा समावेश असावा. पण शक्यतो कलिंगड खावं. कलिंगडात नैसर्गिकरित्या पाण्याचा मुबलक प्रमाण असतं. त्यामुळे जर शरीर डिहायड्रेड झालं असेल तर कलिंगडामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि पाण्याची पातळी स्थिर होण्यास मदत मिळते.
    • स्ट्रेच करून पहा – बऱ्याच वेळा नसा किंवा स्नायूंवर ताण आला की डोकं दुखू लागतं. यात काही वेळा पाठीचा वरचा भाग, मान, खांदे यांच्यावर ताण पडल्याने डोकं दुखतं. त्यामुळे डोकं दुखायला लागल्यावर मानेचं स्ट्रेचिंग करुन पाहावं. यात मान डावीकडे-उजवीकडे, वर-खाली सावकाशपणे फिरवल्यास शरिरातील अनेक स्नायूंची हलचाल होऊन ते थोडे मोकळे होतात.
    • दीर्घ श्वास घ्या आणि सोडा – ऑक्सिजनची कमतरता हेही डोकेदुखीचे एक कारण असू शकते. त्यामुळे डोके दुखत असल्यास जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल अशा भरपूर झाडं असलेल्या भागात एखादा फेरफटका मारावा. हा फेरफटका मारताना मोठ्याने श्वास घ्यावा आणि सोडावा. डोकेदुखी नक्कीच कमी होते.
    • बर्फाचा शेक – अनेकदा डोक्यामधील नसांना सूज असल्यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक दिल्यास फायद्याचे ठरते. ( सौजन्य : जनसत्ता)

Web Title: Natural headache remedies for instant relief ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.