• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to reduce body heat naturally ssj

शरीरातील उष्णता वाढल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय

August 29, 2020 14:45 IST
Follow Us
    • अनेकांच्या अंगात उष्णतेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अशा व्यक्तींना कोणत्याही ऋतुमध्ये उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. अनेक जणांना या काळात डोळ्यांची आग होणे, छातीत जळजळणे, अंगावर उष्णतेचे फोड येणं अशा तक्रारी जाणवतात. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्याचे काही घरगुती उपाय आहेत. हे उपाय कोणते ते घेऊयात.
    • शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मनुके हा सर्वोत्तम पर्याय आहे. दररोज राजी १०० ग्रॅम मनुका कोमट पाण्यात भिजवावे. सकाळी उठल्यावर या मनुका पाण्यासकट चावून खाव्यात.
    • ताकामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे दररोज दुपारी जेवण झाल्यावर ताक प्यावं. मात्र रात्रीच्या वेळी कधीही ताकाचं सेवन करु नये.
    • जिरे अत्यंत थंड आहेत. त्यामुळे रात्री एक कप पाण्यात अर्धा चमचा जिरं घालावेत. त्यानंतर सकाळी हे पाणी प्यावे. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. तसंच वजनदेखील नियंत्रणात येते.
    • सब्जा रात्री काचेच्या भांड्यामध्ये भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून उपाशीपोटी घ्यावा.
    • कायम सकस आणि पौष्टिक आहार घ्यावा. तसंच सकाळ आणि दुपारचे जेवण वेळात आणि लवकर करावे.
    • शक्यतो पाणीदार फळांचं सेवन करावं. यात कलिंगड, ताडगोळे, द्राक्ष, डाळींब या फळांचं सेवन करावं.
    • भरपूर पाणी प्यावं. तसंच माठातील पाणी पिण्यावर भर द्यावा. शक्यतो फ्रिजमधील गारं पाणी पिण्याचं टाळावं.
    • स्वयंपाकात जिराच्या वापर वाढवावा.
    • लिंबाचं सरबत प्यावं. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी भरुन निघते.
    • शक्यतो जेवताना पुदिन्याचा वापर जास्त करावा. पुदिन्याची चटणी करुनदेखील जेवताना त्याचा आहारात समावेश करता येईल.
    • कधीकधी नाईलाजाने आपल्याला स्पायसी फूड म्हणजे मसालेदार पदार्थ खावे लागतात आणि ते खाण्यात आल्यावर ती थोड्यावेळाने लगेच कोकम सरबत घ्यावे

Web Title: How to reduce body heat naturally ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.