• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. whatsapp payment upi based payment is now available in india bmh

आता व्हॉट्सअ‍ॅपवरुनही पाठवा पैसे, अशी आहे प्रक्रिया

Updated: September 9, 2021 18:37 IST
Follow Us
  • WhatsApp UPI Payment : भारतात आता व्हॉट्स अ‍ॅपवरुन फक्त संवादच नाही, तर आर्थिक व्यवहारही करता येणार आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयनं गुरूवारी यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला परवानगी दिली आहे. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅपवरुन पैसेही पाठवता येणार आहेत. (प्रातिनिधीक छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)
    1/10

    WhatsApp UPI Payment : भारतात आता व्हॉट्स अ‍ॅपवरुन फक्त संवादच नाही, तर आर्थिक व्यवहारही करता येणार आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयनं गुरूवारी यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला परवानगी दिली आहे. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅपवरुन पैसेही पाठवता येणार आहेत. (प्रातिनिधीक छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)

  • 2/10

    मागील काही वर्षांपासून व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवण्याची सुविधा सुरू होणार असल्याची चर्चा होती. अखेर प्रतीक्षा संपली आहे. WhatsApp UPI आधारित ही पेमेंट सेवा असून, यापूर्वीच तिची चाचणीही झालेली आहे. (source-AP)

  • 3/10

    फेसबुकचे इंडिया हेड अजित मोहन यांनी याविषयीची माहिती दिली. "भारतात व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवण्याची प्रात्यक्षिक झालं आहे आणि लोकही व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवू शकतील. या सेवेबद्दल आम्ही उत्साही आहोत की, कंपनी भारतात डिजिटल पेमेंट करण्यातही योगदान देऊ शकेल."

  • 4/10

    भारतात व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सेवा दहा प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. जर वापरकर्त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पेमेंटचा पर्याय असेल, तर त्याचा वापर करता येणार आहे. हा पर्याय नसेल तर व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करून हा पर्याय बघता येणार आहे.

  • 5/10

    व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटचा वापर करण्यासाठी वापरकर्त्याजवळ डेबिट कार्ड असणं अनिवार्य आहे. हे डेबिट कार्ड UPIला सर्पोट करणार हवं. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट पर्यायावर जाऊन बँकेची निवड करायची आहे. त्यानंतर माहिती भरून सेवा सुरू करायची आहे.

  • 6/10

    व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की,"आजपासून देशभरात व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पैसे पाठवता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवण्याचा अनुभव मेसेज पाठवण्या इतकाच सोप्पा असेल," असा दावा कंपनीनं केला आहे.

  • 7/10

    व्हॉट्सअ‍ॅपने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्यानं UPIवर आधारित पेमेंट सिस्टिम तयार केली आहे. (Source-Reuters)

  • 8/10

    व्हॉट्सअ‍ॅपने पेमेंट सेवेसाठी पाच मोठ्या बँकांसोबतही करार केला आहे. यात ICICI bank, HDFC bank, Axis bank, SBI आणि JIO Payments bank यांचा समावेश आहे.

  • 9/10

    इतकंच नाही, तर व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हॉट्सअ‍ॅपलाच पैसेच येणार नाही, तर UPI सिस्टीमला सपोर्ट करणाऱ्या कोणत्याही अ‍ॅपवर पैसे पाठवता येणार आहे. म्हणजे समोरची व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटचा वापर करत नसेल तरीही त्याला पैसे पाठवता येणार आहेत.

  • 10/10

    व्हॉट्सअ‍ॅप म्हटल्याप्रमाणे पैसे पाठवणं सुरक्षित असणार आहे. कारण प्रत्येक व्यवहारासाठी UPI पिन अनिवार्य असणार आहे. WhatsApp payments अॅण्ड्राईड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे. त्यासाठी फक्त अ‍ॅप अपडेट करावं लागणार आहे.

Web Title: Whatsapp payment upi based payment is now available in india bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.