-
जपानची आघाडीची कार कंपनी टोयोटाने (Toyota) काही दिवसांपूर्वीच बाजारात आपली एक नवीन सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. कंपनीने आपल्या या अल्ट्रा-कॉम्पॅक्ट बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकलचे (BEV) नाव C+pod ठेवलंय.
-
आकाराने छोटी असली तरी दिसायला म्हणजेच डिझाइनच्या बाबतीत ही कार अत्यंत आकर्षक आहे.
-
कंपनीने ही कार दोन व्हेरिअंट्समध्ये आणली आहे. कारच्या X ट्रिमचं वजन 670 किलो तर, G ट्रिमचं वजन 690 किलोग्राम आहे. चिंचोळ्या जागेतून किंवा गर्दीतून जाण्याच्या दृष्टीकोनातून ही गाडी खास डिझाइन करण्यात आली आहे.
-
या कारमध्ये कंपनीने ९.०६ kWh च्या लिथियम आयन बॅटरी पॅकचा वापर केलाय. यात वापर करण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर 12.3HP ची पॉवर आणि 56NM टॉर्क जनरेट करते.
-
विशेष म्हणजे ही कार, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर १५० किलोमीटर पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. तर, ६० किलोमीटर प्रतितास इतका या कारचा टॉप स्पीड आहे. शिवाय कारची बॅटरी फक्त पाच तासांमध्ये पूर्ण चार्ज होते.
-
ही एक अत्यंत लहान कार असून कारचं इंटेरियरही खूपच कॉम्पॅक्ट आहे. गाडीच्या मागील भागात एक लहान बूट स्पेस मिळेल, तर सेंट्रल कन्सोलमध्ये एक मुख्य बटण आहे. स्पीडोमीटर मधोमध असून गाडीच्या दोन्ही बाजूला एसी व्हेंट्स आहेत.
-
या कारच्या एक्सटीरियर पॅनल्सला प्लास्टिकच्या सहाय्याने बनवण्यात आले आहे. प्लास्टिकचा वापर केला असला तरी त्याबाबत कोणतीही काळजी करण्याची गरज नाही, आम्ही आवश्यक सर्व खबरदारी घेतली आहे असं कंपनीकडून सांगण्यात आलंय.
-
Toyota C+Pod ची लांबी 2,490 मिलीमीटर, रुंदी 1,290 मिलीमीटर आणि उंची 1,550 मिलीमीटर आहे. तर, टर्निंग रेडियस 3.9 मीटर आहे, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणातही ही कार सहजपणे वळवता येते.
-
या कारमध्ये केवळ दोनच व्यक्ती बसू शकतात.कंपनीने ही कार दोन व्हेरिअंट्समध्ये आणली आहे. कारच्या X ट्रिमचं वजन 670 किलो तर, G ट्रिमचं वजन 690 किलोग्राम आहे.
-
चिंचोळ्या जागेतून किंवा गर्दीतून जाण्याच्या दृष्टीकोनातून ही गाडी खास डिझाइन करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणाहून जाताना पायी चालणाऱ्या एखाद्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या एखाद्या वाहनासोबत टक्कर होऊ नये यासाठी या कारमध्ये विशेष फिचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने ही कार दोन व्हेरिअंट्समध्ये आणली आहे. कारच्या X ट्रिमचं वजन 670 किलो तर, G ट्रिमचं वजन 690 किलोग्राम आहे. C+pod च्या X व्हेरिअंटची किंमत 1.65 मिलियन येन म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 11.75 लाख रुपये आहे. तर, G व्हेरिअंटची किंमत 1.71 मिलियन येन म्हणजेच भारतीय चलनानुसार साधारण 12.15 लाख रुपये आहे. सध्या कंपनीने ही कार जपानमध्ये लाँच केलीये. पण भारतीय मार्केटमध्येही इलेक्ट्रिक वाहनांची डिमांड दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लवकरच कंपनी ही गाडी भारतातही लाँच करेल असं सांगितलं जात आहे. ( सर्व फोटो global.toyota )
सिंगल चार्जमध्ये 150 किमी प्रवास, Toyota ने लाँच केली सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार
केवळ ५ तासांमध्येच पूर्ण चार्ज होते बॅटरी…
Web Title: Toyota launches c pod bev small electric car with 150km of range sas