Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. xiaomi sells mi 10i worth rupees 200 crore during the first sale check price and specifications sas

स्वस्त 5G फोनची भारतात जबरदस्त डिमांड, पहिल्याच सेलमध्ये विकले 200 कोटींचे स्मार्टफोन; किंमत फक्त…

भारतीयांच्या गरजेनुसार डिझाइन, पहिल्याच सेलमध्ये ग्राहकांच्या उड्या

Updated: September 9, 2021 00:38 IST
Follow Us
  • शाओमीने भारतात काही दिवसांपूर्वीच 2021 या नव्या वर्षातील आपला नवीन 5G स्मार्टफोन Mi 10i लाँच केला. तब्बल 105 MP क्षमतेचा कॅमेरा असलेल्या या शानदार स्मार्टफोनची भारतात जबरदस्त डिमांड असल्याचं समोर आलंय.
    1/10

    शाओमीने भारतात काही दिवसांपूर्वीच 2021 या नव्या वर्षातील आपला नवीन 5G स्मार्टफोन Mi 10i लाँच केला. तब्बल 105 MP क्षमतेचा कॅमेरा असलेल्या या शानदार स्मार्टफोनची भारतात जबरदस्त डिमांड असल्याचं समोर आलंय.

  • 2/10

    सात जानेवारी रोजी या फोनसाठी कंपनीने पहिल्या सेलचं आयोजन केलं होतं. विशेष म्हणजे पहिल्याच सेलमध्ये कंपनीने तब्बल 200 कोटी रुपयांच्या Mi 10i फोन्सची विक्री केली. शाओमीचे भारतातील प्रमुख मनू कुमार जैन यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.

  • 3/10

    Mi 10i या नावातील ‘I’ चा अर्थ इंडिया असून हा फोन भारतीयांच्या गरजेनुसार डिझाइन करण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

  • 4/10

    Mi 10i मध्ये कंपनीने स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर आणि तब्बल 108 मेगापिक्सेलचा Samsung HM2 sensor दिलाय.

  • 5/10

    Mi 10i स्पेसिफिकेशन्स : Mi 10i मध्ये अँड्रॉइड 10 आधारित MIUI 12 आहे. याशिवाय फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले असून डिस्प्लेसोबतच वॉटर ड्रॉप नॉच आहे. डिस्प्लेसोबत HDR आणि HDR10+ चा सपोर्ट आहे.

  • 6/10

    Mi 10i स्टोरेज : फोनच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनलवर गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर असून, हे एक 5जी प्रोसेसर आहे. ग्राफिक्ससाठी यामध्ये एड्रेनो 619 GPU आहे, तर 8 जीबीपर्यंत रॅम आणि 128 जीबीपर्यंत स्टोरेज फोनमध्ये मिळेल.

  • 7/10

    Mi 10i कॅमेरा :फोनमध्ये चार रिअर कॅमेरे आहेत. यातील मुख्य लेन्स 108 मेगापिक्सेल Samsung HM2 सेन्सर आहे. तर, दुसरा 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड, तिसरा 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो आणि चौथा 2 मेगापिक्सेलचा डेफ्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळेल. कॅमेऱ्यासोबत 4के व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधाही आहे.

  • 8/10

    Mi 10i बॅटरी : Mi 10i मध्ये 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4820mAh ची बॅटरी आहे. अवघ्या ३० मिनिटांत फोनची बॅटरी 68 टक्के चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 5G, USB Type-C पोर्ट, 3.5mm ऑडिओ जॅक, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ यांसारखे फिचर्स आहेत. याशिवाय फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरही आहे.

  • 9/10

    Mi 10i कलर : पॅसिफिक सनराइज, मिडनाइट ब्लॅक आणि अटलांटिक ब्लू अशा तीन कलर्समध्ये हा फोन खरेदी करता येईल. लाँचिंग ऑफरअंतर्गत जिओकडून या फोनच्या खरेदीवर 10 हजार रुपयांपर्यंतचे बेनिफिट्सही आहेत.

  • 10/10

    Mi 10i ची किंमत : 2021 मध्ये लाँच झालेला हा पहिला स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. Mi 10i च्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 20 हजार 999 रुपये, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 21 हजार 999 रुपये आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 23 हजार 999 रुपये आहे. वनप्लस नॉर्डसोबत तुलना करायची झाल्यास वनप्लस नॉर्डच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये तर टॉप व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये आहे. म्हणजेच वनप्लस नॉर्डच्या तुलनेत Mi 10i बराच स्वस्त आहे.

Web Title: Xiaomi sells mi 10i worth rupees 200 crore during the first sale check price and specifications sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.