-
१ ऑगस्टपासून देशभरात अनेक बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि जीवनावर होईल. म्हणूनच या बदलांची माहिती तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे. १ ऑगस्टपासून बँकेतून व्यवहार, ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणारे शुल्क असे काही बदल होणार होणार आहेत.
-
१ ऑगस्टपासून रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही बँकेतून व्यवहार करता येणार आहेत. आरबीआयने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (NACH) प्रणाली सात दिवस कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, आता तुम्हाला तुमच्या पगारासाठी किंवा पेन्शनसाठी शनिवार आणि रविवार जाण्याची वाट पाहावी लागणार नाही. (प्रातिनिधीक छायाचित्र)
-
याशिवाय, सुट्टीच्या दिवशी तुमच्या खात्यातून हप्ताही कापला जाईल. म्हणजेच १ ऑगस्टपासून तुम्हाला यापुढे पगार, पेन्शन आणि ईएमआय पेमेंट सारख्या महत्त्वाच्या व्यवहारासाठी कामाच्या दिवसांची वाट पाहावी लागणार नाही. (प्रातिनिधीक छायाचित्र)
-
आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी पैसे काढणे, जमा करणे आणि चेक बुक शुल्कासह अनेक नियम बदलणार आहेत. तुम्ही बँकेच्या शाखेत चेकद्वारे फक्त ४ वेळा मोफत रोख व्यवहार करू शकाल. चारपेक्षा जास्त ठेवी किंवा पैसे काढण्यासाठी प्रत्येक वेळी १५० रुपये शुल्क भरावे लागेल.
-
१ ऑगस्टपासून ATM द्वारे, तुम्ही ६ महानगरांमध्ये महिन्यातून ३ वेळा मोफत व्यवहार करू शकता. याशिवाय इतर शहरांमध्ये ५ व्यवहार मोफत आहेत. यावर व्यवहारासाठी शुल्क आकारले जाईल. शुल्क म्हणून, तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर मेट्रो शहरांमध्ये २० रुपये आणि इतर शहरांमध्ये ८.५० रुपये भरावे लागतील.
-
१ ऑगस्टपासून एटीएम इंटरचेंज फी १५ रुपयांवरून १७ रुपये केली जाईल. तर गैर-आर्थिक व्यवहारांवर देखील शुल्क ५ रुपयांवरून ६ रुपये केले जाईल.
-
बँकांनी ग्राहकांच्या सोयीसाठी सर्वत्र एटीएम लावले आहेत. इतर बँकांचे ग्राहकही या मशीनमधून पैसे काढतात किंवा हस्तांतरित करतात. प्रत्येक बँकेने मोफत व्यवहाराची मर्यादा निश्चित केली आहे. त्यापेक्षा जास्त व्यवहारासाठी ग्राहकांकडून शुल्क आकारले जाते. याला इंटरचेंज फी म्हणतात.
-
१ ऑगस्टपासून इंडियन पोस्ट पेमेंट बँक (IPPB) च्या डोअर स्टेप बँकिंग सुविधेसाठी फी भरावी लागेल. IPPB च्या मते, आता प्रत्येक वेळी डोअर स्टेप बँकिंग सुविधेसाठी २० रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल. आतापर्यंत डोअर स्टेप बँकिंगसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते.
-
या व्यतिरिक्त, ग्राहकाला मनी ट्रान्सफर आणि मोबाईल पेमेंट इत्यादीसाठी २० रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल. आयपीपीबी खाते किंवा इतर कोणत्याही बँकेच्या ग्राहक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासाठी समान शुल्क भरावे लागेल.
-
ऑगस्ट महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या किंमती बदलू शकतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी केंद्र सरकार एलपीजी सिलेंडरच्या नवीन किंमतीची घोषणा करते. गेल्या महिन्यात सरकारने १४.२ किलो घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत २५.५० रुपयांची वाढ केली होती.
ATM ते गॅस सिलिंडर : या गोष्टी लक्षात ठेवा, नाही तर १ तारखेपासून खिशाला बसेल भूर्दंड
Web Title: Atm to gas cylinder you dont remember these things you will have a lot of money in your pocket from the 1st august abn