• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. jio phone next cost upto rs 15700 after emi jio phone emi plans abn

JioPhone Next १५००० पेक्षा महाग! EMI चे सत्य जाणून व्हाल थक्क

JioPhone Next खरेदी करण्यासाठी चार EMI पर्याय उपलब्ध असणार आहेत.

October 30, 2021 19:03 IST
Follow Us
  • दीर्घ प्रतीक्षेनंतर JioPhone Next भारतात लाँच करण्यात आला आहे. वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेत पहिला Jio-Google स्मार्टफोन 'JioPhone Next' ची घोषणा केली होती.
    1/15

    दीर्घ प्रतीक्षेनंतर JioPhone Next भारतात लाँच करण्यात आला आहे. वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेत पहिला Jio-Google स्मार्टफोन ‘JioPhone Next’ ची घोषणा केली होती.

  • 2/15

    JioPhone Next खरेदी करण्यासाठी, ग्राहकांना १,९९९ रुपये डाउन पेमेंट करावे लागणार आहे. पण हे एवढेच नाही. या ऑफरशी संलग्न अनेक अटी आणि नियम आहेत.

  • 3/15

    EMI वर या फोनची किंमत १५७०० रुपयांपर्यंत असेल, तरीही यूजरला दोन वर्षांपर्यंत डेटा आणि कॉलिंगची चिंता नसणार आहे

  • 4/15

    JioPhone Next ची किंमत ६,४९९ रुपये आहे आणि Micromax, Itel, Samsung, Nokia सारख्या ब्रँड्सचे बरेच स्वस्त Android फोन बाजारात उपलब्ध आहेत.

  • 5/15

    आपल्या प्रतिस्पर्ध्यांपासून वेगळे राहण्यासाठी, रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी EMI पर्याय आणि डेटा ऑफरसह JioPhone Next खरेदी करणे सोपे करत आहे.

  • 6/15

    ज्या ग्राहकांना JioPhone Next खरेदी करायचा आहे त्यांच्यासाठी Jioने चार EMI प्लॅन ऑफर करत आहे. यामध्ये Always-On प्लान, Large प्लान, XL प्लान आणि XXL प्लान. या ईएमआय योजना डेटा आणि कॉलिंग फायद्यांसह जीओच्या ग्राहकांना मिळणार आहेत.

  • 7/15

    या ईएमआय किंवा आर्थिक योजनांसह, जिओ ग्राहकांना प्रथमच JioPhone नेक्स्ट खरेदी करणे सोपे करत आहे ज्याची किंमत रु. १,९९९ आहे. पण शेवटी ग्राहकाला मासिक EMI + रु ५०१ EMI प्रोसेसिंग फी फायनान्स कंपनीला निर्धारित कालावधीसाठी भरावी लागणार आहे. त्याची एकूण बेरीज जास्त आहे

  • 8/15

    उदाहरणार्थ, बेस EMI योजना असलेल्या ग्राहकांना JioPhone Next आणि अतिरिक्त कॉलिंग आणि डेटा फायद्यांसाठी ९,१९९ रुपये द्यावे लागतील.

  • 9/15

    JioPhone Next खरेदी करण्यासाठी चार EMI पर्याय उपलब्ध असणार आहेत.

  • 10/15

    Always on plan: यामध्ये २४ महिन्यांसाठी ३०० रुपये प्रति महिना किंवा १८ महिन्यांसाठी ३५० रुपये प्रति महिना भरावे लागणार आहेत. म्हणजेच, जर तुम्ही हे दोन प्लान निवडले तर JioPhone Next ची एकूण किंमत अनुक्रमे ९७०० रुपये आणि ८८०० रुपये असेल. (ईएमआय किंमती + डाउन पेमेंट + ईएमआय प्रक्रिया (₹५०१) शुल्क समाविष्ट) (ANI)

  • 11/15

    Large plan: यामध्ये २४ महिन्यांसाठी ४५० रुपये प्रति महिना किंवा १८ महिन्यांसाठी ५०० रुपये प्रति महिना भरावे लागणार आहेत. म्हणजेच, तुम्ही हे दोन प्लान निवडल्यास, JioPhone Next ची एकूण किंमत अनुक्रमे १३३०० रुपये आणि ११५०० रुपये असेल. (ईएमआय किंमती + डाउन पेमेंट + ईएमआय प्रक्रिया (₹५०१) शुल्क समाविष्ट)

  • 12/15

    XL plan: यामध्ये २४ महिन्यांसाठी ५०० रुपये प्रति महिना किंवा १८ महिन्यांसाठी ५५० रुपये प्रति महिना भरावे लागणार आहे. म्हणजेच, जर तुम्ही हे दोन प्लान निवडले तर JioPhone Next ची एकूण किंमत अनुक्रमे १४५०० रुपये आणि १२४०० रुपये असेल. (ईएमआय किंमती + डाउन पेमेंट + ईएमआय प्रक्रिया (₹५०१) शुल्क समाविष्ट)

  • 13/15

    XXL plan: यामध्ये २४ महिन्यांसाठी ५५० रुपये प्रति महिना किंवा १८ महिन्यांसाठी प्रति महिना ६०० रुपये आहे. म्हणजेच, तुम्ही या दोन योजना निवडल्यास, JioPhone Next ची एकूण किंमत अनुक्रमे Rs १५,७०० आणि १३,३०० आहे (यात EMI किंमती + डाउन पेमेंट + EMI प्रक्रिया (₹ ५०१) शुल्क समाविष्ट)

  • 14/15

    तुम्ही कोणत्याही ईएमआयची निवड न केल्यास, तुम्हाला ६४९९ रुपये थेट भरावे लागणार नाहीत. तुम्हाला EMI पर्यायांसह मिळणारा फायदा म्हणजे अतिरिक्त डेटा आणि कॉलिंग फायदे.

  • 15/15

    JioPhone Next हा जुन्या JioPhone २ पेक्षा अपग्रेड आहे. नवीन Jio-Google स्मार्टफोन १३-मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा, ८-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, ५.४५-इंच टचस्क्रीन HD डिस्प्ले ७२० x १४४० पिक्सेल स्क्रीन रिझोल्यूशनसह येतो.  Qualcomm Snapdragon QM-215 SoC, 2GB RAM आणि 32GB स्टोरेज, 3500mAh बॅटरी, ड्युअल सिम सपोर्ट, MicroUSB, 3.5mm हेडफोन जॅक सपोर्ट, PragatiOS, Google Play Store, YouTube आणि इतर सपोर्टसह उपलब्ध आहे

Web Title: Jio phone next cost upto rs 15700 after emi jio phone emi plans abn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.