• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what is no shave november find out the real reason for the campaign ttg

‘नो शेव्ह नोव्हेंबर’ म्हणजे काय?; जाणून घ्या मोहिमेचे खरं कारण

खरतर ‘नो शेव नोव्हेंबर’ ही मोहीम फक्त दाढी न करण्यापुरते मर्यादित आहे असे नाही. या मोहिमेमागे एक महत्त्वपूर्ण कारण आहे.

November 1, 2021 18:25 IST
Follow Us
  • दरवर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला 'नो शेव नोव्हेंबर' किंवा 'मुव्हेंबर' हे शब्द डोळ्यासमोर येतात.
    1/18

    दरवर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला ‘नो शेव नोव्हेंबर’ किंवा ‘मुव्हेंबर’ हे शब्द डोळ्यासमोर येतात.

  • 2/18

    पहिला आठवडा संपल्यानंतर या हॅशटॅगची फोटो सोशल मीडियावर दिसू लागतात.

  • 3/18

    खरतर ही मोहीम फक्त दाढी न करण्यापुरते मर्यादित आहे असे नाही. काटिंग, वॅक्सिंग, थ्रेडिंग अर्थात शरीराचे केस काढण्यासाठी केलेली प्रत्येक व्यवस्था नोव्हेंबरमध्ये बंद केली जाते. हे केवळ एका शहरात किंवा देशातच नाही तर जगभरात केले जाते.

  • 4/18

    हे सर्व असूनही नो शेव्ह नोव्हेंबर साजरा करणार्‍या अनेकांना तो साजरा करण्यामागचे कारण माहीत नसतं.

  • 5/18

    काही आळशी लोकांसाठी, केस आणि दाढीच्या काळजीपासून काही दिवस आराम मिळण्याची ही एक संधी आहे.

  • 6/18

    नोव्हेंबरमध्ये दरवर्षी या महिन्यात लोकांचे ‘बाल’ प्रेम जागृत होते. नो शेव्ह नोव्हेंबर या शब्दाचा अर्थ काय आहे?

  • 7/18

    ‘नो शेव नोव्हेंबर’ ही खरं तर कॅन्सरच्या विशेषत: प्रोस्टेट कॅन्सरच्या जनजागृतीसाठी सुरू केलेली मोहीम आहे.

  • 8/18

    या मोहिमेला पाठिंबा देणारे लोक नोव्हेंबर महिन्यात दाढी किंवा केस कापणे बंद करतात.

  • 9/18

    केसांच्या देखभालीच्या खर्चाएवढी रक्कम या मोहिमेसाठी दान केली जाते.

  • 10/18

    ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहीम २००९ ली ‘मॅथ्यू हिल फाउंडेशन’ या अमेरिकन ना-नफा संस्थेने सुरू केली होती.

  • 11/18

    मॅथ्यू हिल फाउंडेशन कर्करोग प्रतिबंध, उपचार किंवा संशोधन आणि शिक्षण यासाठी काम करणाऱ्या संस्थांना हे निधी देते.

  • 12/18

    त्याची सुरुवातीची कथा जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. नोव्हेंबर २००७ मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात राहणाऱ्या मॅथ्यू हिलचा कर्करोगाशी लढताना मृत्यू झाला.

  • 13/18

    यानंतर त्यांच्या आठ मुलांनी त्यांच्या वडिलांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्यासारख्या कर्करोगाशी लढणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी काहीतरी करण्याचा विचार केला आणि नो शेव्ह नोव्हेंबर मोहीम सुरू केली.

  • 14/18

    लॉंच झाल्यानंतर दोन वर्षांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला.

  • 15/18

    परंतु याचा परिणाम असा झाला आहे की लोकांना नो शेव्ह नोव्हेंबर का साजरा केला जातो याचे कारण माहित नाही.

  • 16/18

    आता ‘मुव्हेंबर’बद्दल बोलूया. मुव्हेंबर मिशी आणि नोव्हेंबर हे दोन शब्द एकत्र करून तयार झालेला शब्द आहे.

  • 17/18

    ‘नो शेव नोव्हेंबर’ प्रमाणे ही देखील एक जनजागृती मोहीम आहे. नो शेव्ह नोव्हेंबर हा केवळ कर्करोगाच्या जागृतीपुरता मर्यादित असला तरी, मुव्हेंबर पुरुषांना त्यांच्या आरोग्याविषयी आणि जीवनशैलीबद्दल जागरूक करण्याचे काम करते.

  • 18/18

    २००४ मध्ये सुरू झालेल्या या मोहिमेत पुरुष नोव्हेंबरमध्ये मिशा वाढवून या मोहिमेला पाठिंबा देतात. (सर्व फोटो: Pixabay)

TOPICS
लाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: What is no shave november find out the real reason for the campaign ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.