• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. why up cm yogi adityanath always shaves of head he explained the reason srk

‘त्या’ घटनेपासून योगी आदित्यनाथ नेहमी करतात मुंडण

सन्यास घेण्यापूर्वीच योगींनी मुंडण करण्यास सुरुवात केली

November 2, 2021 18:37 IST
Follow Us
  • योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून १९९८ सालापासून गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत.
    1/11

    योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून १९९८ सालापासून गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत.

  • 2/11

    २०१७ विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यनाथ ह्यांचे नाव सुचवले गेले होते. १८ मार्च २०१७ रोजी झालेल्या भाजपच्या विधिमंडळ बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले व १९ मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

  • 3/11

    आदित्यनाथ जहाल हिंदूवादी मानले जातात व त्यांच्यावर अनेकदा प्रक्षोभक विधाने केल्याचा आरोप झाला आहे. परंतु मुख्यमंत्री बनल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण कोणताही भेदभाव न करता राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे जाहीर केले होते. 

  • 4/11

    योगी आदित्यनाथ नेहमी मुंडण का करतात, हे तुम्हाला माहीत आहे का? ते सन्यासी असल्यामुळे मुंडण करतात असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात.  

  • 5/11

    सन्यास घेण्यापूर्वीच योगींनी मुंडण करण्यास सुरुवात केली होती आणि यामागचे कारण त्यांनी स्वतः सांगितले होते.

  • 6/11

     शिक्षणाधिकाऱ्यांच्या एका परिषदेत आपले जुने दिवस आठवून योगी सांगत होते की, शालेय जीवनात त्यांचे शिक्षक कसे कठोर असायचे.

  • 7/11

    योगी यांनी सांगितले होते की, जेव्हा ते शाळेत जायचे तेव्हा त्यांचे प्राथमिक शिक्षक आधी मुले आंघोळ करून शाळेत आली की नाही हे तपासायचे.

  • 8/11

    योगी म्हणाले की, शिक्षक मुलांची नखे आणि केस लहान ठेवण्याची सक्ती करायचे.

  • 9/11

    तेव्हापासून त्यांनी ठरवले होते की आपण आपले केस कधीही मोठे ठेवणार नाही आणि आजही ते केस वाढताच मुंडण करतात.

  • 10/11

    योगी म्हणाले, आजकालच्या मुलांचे केस लांब असतात आणि ते कंगवाही करत नाहीत. मुले नेहमी त्यांच्या केसांवर लक्ष केंद्रित करतात. त्यांची एकाग्रता फक्त केसांमध्येच असते.

  • 11/11

    योगींनी शिक्षकांना सांगितले होते की, जर त्यांनी मुलांना शिक्षणासोबतच मूलभूत स्वच्छतेचे पालन करण्याची सक्ती केली तर ते आयुष्यात नेहमीच चांगले काम करतील.

Web Title: Why up cm yogi adityanath always shaves of head he explained the reason srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.