• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. you can order pvc aadhar card for rs 50 at home apply process rmt

Photo: घर बसल्या ५० रुपयात मागवू शकता PVC आधार कार्ड; असा अर्ज करा

तुम्हालाही तुमचे पीव्हीसी आधार कार्ड हवे असल्यास, या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही ते घरबसल्या मिळवू शकता.

December 8, 2021 14:22 IST
Follow Us
  • आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. त्याचा वापर बँकांपासून शाळा, महाविद्यालये, सरकारी-निमसरकारी कार्यालये आणि इतर ठिकाणी केला जातो. (संग्रहित फोटो)
    1/10

    आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. त्याचा वापर बँकांपासून शाळा, महाविद्यालये, सरकारी-निमसरकारी कार्यालये आणि इतर ठिकाणी केला जातो. (संग्रहित फोटो)

  • 2/10

    आजही अनेकांकडे असलेले आधार कार्ड कागदीच आहे. या प्रकारचे आधार कार्ड खूप जपून ठेवावं लागतं. कागदी असल्यामुळे आधार कार्ड लवकर खराब होते. फाटणे किंवा पावसात भिजण्याची शक्यता असते. (संग्रहित फोटो)

  • 3/10

    तुमच्याकडे प्लॅस्टिकचे आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. हे आधार कार्ड तुमच्या एटीएम कार्डसारखेच आहे, ज्याला पीव्हीसी आधार कार्ड असेही म्हणतात. (संग्रहित फोटो)

  • 4/10

    तुम्हालाही तुमचे पीव्हीसी आधार कार्ड हवे असल्यास, या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही ते घरबसल्या मिळवू शकता. ज्यासाठी तुम्हाला ५० रुपये फी भरावी लागेल. (संग्रहित फोटो)

  • 5/10

    पीव्हीसी आधार कार्ड घरबसल्या मिळवण्यासाठी, तुम्हाला प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in/my-aadhaar/get-aadhaar.html ला भेट द्यावी लागेल. (संग्रहित फोटो)

  • 6/10

    तुम्हाला पेज खाली स्क्रोल करावे लागेल आणि तेथून Order Aadhar PVC Card चा पर्याय निवडावा लागेल. (संग्रहित फोटो)

  • 7/10

    तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल, सुरक्षा कोड भरा. आता खाली दिलेल्या Send OTP पर्यायावर क्लिक करा. (संग्रहित फोटो)

  • 8/10

    आता तुमच्या फोनवर एक OTP येईल, तो भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा तपशील तपासावा लागेल आणि सर्व माहिती बरोबर आल्यानंतरच पेमेंट करावे लागेल. (संग्रहित फोटो)

  • 9/10

    पेमेंटसाठी, तुम्ही UPI, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड यापैकी कोणताही पर्याय वापरून तुमची फी भरू शकता. (संग्रहित फोटो)

  • 10/10

    एकदा तुम्ही पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला एक स्लिप मिळेल आणि तुमचे PVC आधार कार्ड स्पीड पोस्टद्वारे तुमच्या आधार कार्डवर नमूद केलेल्या पत्त्यावर काही दिवसांत वितरित केले जाईल. (संग्रहित फोटो)

TOPICS
आधार कार्डAadhar Card

Web Title: You can order pvc aadhar card for rs 50 at home apply process rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.