• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. dont make these mistakes regarding pan card otherwise fine of rs 10000 rmt

पॅनकार्डबाबत या चुका करू नका!, अन्यथा भरावा लागेल १० हजारांचा दंड

पॅन कार्डचा वापर महत्त्वाचा कागदपत्र म्हणून केला जातो.

December 29, 2021 10:17 IST
Follow Us
  • पॅन कार्डचा वापर महत्त्वाचा कागदपत्र म्हणून केला जातो. बँकेत कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारात पॅन कार्डचा वापर आवश्यक कागदपत्र म्हणून केला जातो. या कार्डाशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. पॅनकार्डवरूनच आयकर विभाग तुमची आलेली आणि व्यवहाराची माहिती तपासते. जर तुम्हाला पॅन कार्डशी संबंधित हे नियम माहित नसतील आणि तुमच्या पॅन कार्डमध्ये अनवधानाने चूक झाल्यास १०,००० रुपयांचा दंड होऊ शकतो.
    1/5

    पॅन कार्डचा वापर महत्त्वाचा कागदपत्र म्हणून केला जातो. बँकेत कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारात पॅन कार्डचा वापर आवश्यक कागदपत्र म्हणून केला जातो. या कार्डाशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. पॅनकार्डवरूनच आयकर विभाग तुमची आलेली आणि व्यवहाराची माहिती तपासते. जर तुम्हाला पॅन कार्डशी संबंधित हे नियम माहित नसतील आणि तुमच्या पॅन कार्डमध्ये अनवधानाने चूक झाल्यास १०,००० रुपयांचा दंड होऊ शकतो.

  • 2/5

    कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी आधार पॅनशी लिंक करण्यात येत आहे. पॅन कार्डमध्ये १० अंकी अल्फान्यूमेरिक नंबर दिलेला असतो. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरलात किंवा कोणत्याही व्यवहाराच्या वेळी चुकीची माहिती भरली आणि दोषी आढळले, तर तुम्हाला या चुकीसाठी कठोर शिक्षा होऊ शकते.

  • 3/5

    जर तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असतील आणि ते तपासात सापडले तर १०,००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. याशिवाय तुमचे बँक खाते गोठवले जाऊ शकते. हे टाळण्यासाठी तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असतील तर दुसरे पॅनकार्ड तात्काळ विभागाकडे जमा करावे लागेल. १९६१ च्या आयकर कायद्याच्या कलम २७२ बी मध्येही यासाठी तरतूद आहे.

  • 4/5

    पॅनकार्ड परत करण्याची प्रक्रिया सोपी आहे. आयआरएस वेबसाइटला भेट देऊन “नवीन पॅन कार्डची विनंती किंवा/आणि पॅन डेटामध्ये बदल किंवा सुधारणा” या लिंकवर क्लिक करून फॉर्ममध्ये प्रवेश करू शकता. फॉर्म भरा आणि कोणत्याही NSDL कार्यालयात परत करा.

  • 5/5

    तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असतील तर तुम्हाला त्यापैकी एक सरेंडर करावे लागेल. या श्रेणीमध्ये एकाच व्यक्तीच्या नावाने जारी केलेली आणि एकाच पत्त्यावर पाठवलेली दोन भिन्न पॅन कार्ड यांचा समावेश असू शकतो. पॅन कार्ड सरेंडर करताना, फॉर्मसह दुसरे पॅन कार्ड सबमिट करा, तुम्ही ऑनलाइनद्वारे देखील सरेंडर करू शकता.

Web Title: Dont make these mistakes regarding pan card otherwise fine of rs 10000 rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.