-
सध्या राज्यात हाडं गोठवणारी थंडी पडली आहे. हिवाळ्यात शक्यतो सर्दी, खोकला आणि फ्लू या आजारांचा त्रास जाणवतो. परंतु सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आणि ओमायक्रॉन या कोविडच्या नव्या व्हेरिएन्टमुळे सर्दी-खोकला झाल्यामुळे अनेकांच्या चिंतेत भर पडते.
-
थंडीत नाक वाहणे, शिंका येणे, घसा खवखवणे, नाक बंद होणे या समस्यांना जवळपास सगळ्यांनाच तोंड द्यावे लागते. अशा वेळी काही घरगुती उपायांमुळे तात्काळ आराम मिळू शकतो. (फोटो सौजन्य : Pexels)
-
हिवाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांपासून आराम देणाऱ्या घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य : Pexels)
-
थंडीच्या दिवसात सूपचे सेवन करा. गरमागरम सूपचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक ठरते. भाज्यांपासून बनवल्या जाणाऱ्या सूपमधून जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे मिळतात. (फोटो सौजन्य : Pexels)
-
घसा खवखवल्याने काही खाण्याची इच्छा होत नसल्यास गरमागरम सूपचे सेवन करा. सूप हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. (फोटो सौजन्य : Pexels)
-
हिवाळ्यात सतत सर्दी होण्याच्या त्रासावर लसूण देखील गुणकारी आहे. लसणामध्ये प्रतिजैविक आणि खोकला दूर करणारे गुणधर्म असतात. लसूण सर्दी टाळण्यास आणि त्यांची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे आहारात लसणाचा समावेश करा. (फोटो सौजन्य : Pexels)
-
स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यात असणाऱ्या हळदीत अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. हळद ही गुणकारी असून अनेक समस्यांवर उपचार म्हणून वापरली जाते.
-
कोमट दुधात हळद मिसळून पिणे हा सर्दी आणि खोकल्याशी लढण्याचा एक लोकप्रिय आणि प्रभावी मार्ग आहे. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट हळदीचे दूध प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
-
थंडीच्या दिवसात दुग्धजन्य, मसालेदार, प्रक्रिया केलेले आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा. दिवसातून दोनदा वाफ घ्या, द्रव पदार्थांचे सेवन वाढवा आणि पुरेशी विश्रांती घ्या.
Photos : बदलत्या हवामानामुळे सर्दी खोकल्याचा त्रास जाणवतोय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळेल आराम
थंडीत नाक वाहणे, शिंका येणे, घसा खवखवणे, नाक बंद होणे या समस्यांना जवळपास सगळ्यांनाच तोंड द्यावे लागते. अशा वेळी काही घरगुती उपायांमुळे तात्काळ आराम मिळू शकतो.
Web Title: Home remedies to get relief from cold and cough kak