-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो. २०२२ या वर्षात अनेक ग्रह राशी बदलतील. न्यायदेवता शनिदेव देखील राशी बदलणार आहे. शनिदेवांचा राशी बदल ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचे आहे.
-
शनि ग्रह राशी बदलतो तेव्हा काही राशींवर शनी साडेसाती सुरू होते तर काही राशींवर शनी अडीचकी सुरू होते. गेल्या वर्षी शनिदेवांनी राशी बदलली नव्हती. मात्र या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये शनिदेव राशी बदलणार आहेत.
-
शनि साडेसातीचे तीन चरण असतात. पहिल्या चरणात शनि मानसिक त्रास देतात. दुसऱ्या चरणात मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. त्याच वेळी, तिसऱ्या चरणात, शनी साडेसतीमुळे होणारे त्रास हळूहळू कमी होऊ लागतात. या चरणात शनि व्यक्तीला आपली चूक सुधारण्याची संधी देतो. या तीन टप्प्यांपैकी साडेसतीचा दुसरा टप्पा सर्वात वेदनादायक मानला जातो.
-
आता २९ एप्रिल २०२२ रोजी शनि पुढील राशी बदल करेल. या काळात मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करेल. सध्या शनि मकर राशीत बसला आहे, त्यामुळे मकर, कुंभ आणि धनु राशीत शनीची साडेसाती सुरू आहे. मकर राशीत साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू असताना, पहिला टप्पा कुंभ राशीत तर शेवटचा टप्पा धनु राशीत सुरू आहे. शनिच्या संक्रमणाने मकर राशीच्या लोकांवर साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल.
-
शनिच्या राशी बदलामुळे कुंभ राशीच्या लोकांवर साडेसातीचे दुसरे चरण सुरू होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना सर्व प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागू शकते. दुस-या टप्प्यात व्यक्तीच्या कौटुंबिक जीवनात चढ-उतार येतात, तसेच त्याला शारीरिक त्रासही सहन करावा लागतो. शनि हा कुंभ राशीचा अधिपती ग्रह असल्याने कुंभ राशीच्या लोकांसाठी दुसरा टप्पा बाकीच्या राशीच्या तुलनेत कमी त्रासदायक असेल.
-
मीन राशीवर पहिला टप्पा ज्याला उदय अवस्था देखील म्हटले जाते ती सुरू होईल.
-
धनु राशीच्या लोकांना शनि साडेसातीपासून मुक्तता मिळेल.
-
कर्क आणि वृश्चिक राशीचे लोक शनि अडीचकीच्या नियंत्रणात येतील.
-
मिथुन आणि तूळ राशीचे लोक अडीचकीच्या प्रभावापासून मुक्त होतील.
Shani Gochar 2022: या राशीच्या लोकांनी व्हा सावध; सुरु होतोय शनि साडेसातीचा काळ
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो. २०२२ या वर्षात अनेक ग्रह राशी बदलतील. न्यायदेवता शनिदेव देखील राशी बदलणार आहे.
Web Title: Shani grah gochar in 29 april 2022 sadesati will start meen rashi rmt