• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. top ten budget automatic transmission car in india rmt

भारतातील १० स्वस्त ऑटोमॅटिक गिअरवाल्या कार, जाणून घ्या वैशिष्ट्य आणि किंमत

भारतीय बाजारपेठ ऑटोमॅटिक ट्रान्समिशन युनिट्स देणार्‍या कार मॉडेल्सने भरलेली आहे.

Updated: February 11, 2022 16:42 IST
Follow Us
  • स्वस्त आणि परवडणाऱ्या कार म्हटल्या की गिअर क्लच दाबून बदलणं आलंच. कारण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन फक्त महागड्या गाड्यांमध्ये येत असा समज आहे. दुसरीकडे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कारचा मायलेज चांगला नसतो असा एक वेगळा गैरसमज आहे. मात्र आता काळ बदलला असून गैरसमज दूर होत आहे. आज, भारतीय बाजारपेठ ऑटोमॅटिक ट्रान्समिशन युनिट्स देणार्‍या कार मॉडेल्सने भरलेली आहे. (Photo- Pixabay)
    1/12

    स्वस्त आणि परवडणाऱ्या कार म्हटल्या की गिअर क्लच दाबून बदलणं आलंच. कारण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन फक्त महागड्या गाड्यांमध्ये येत असा समज आहे. दुसरीकडे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कारचा मायलेज चांगला नसतो असा एक वेगळा गैरसमज आहे. मात्र आता काळ बदलला असून गैरसमज दूर होत आहे. आज, भारतीय बाजारपेठ ऑटोमॅटिक ट्रान्समिशन युनिट्स देणार्‍या कार मॉडेल्सने भरलेली आहे. (Photo- Pixabay)

  • 2/12

    मॅन्युअल गियर शिफ्टर असलेल्या कार अजूनही ऑटोमॅटिक काउंटरपार्ट्सपेक्षा जास्त विकतात हे खरे आहे. तरी हे अंतर गेल्या काही महिन्यात कमी होत आहे. देशात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. त्यामुळे संयमानं गाडी चालवावी लागते. स्वयंचलित ट्रान्समिशनमुळे वाहन चालवणे सोयीस्कर होतं. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक कारमधील किमतीतील तफावत तितकी नसल्याने अधिकाधिक लोक क्लच-लेस ड्राइव्हची निवड करत आहेत. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की, बजेटमध्ये तुमच्या आवडीच्या मॉडेलमध्ये खरंच ऑटोमॅटिक कार खरेदी करू शकता का? चला तर पाहूयात कोणत्या गाड्या आहेत. (Photo- Financial Express)

  • 3/12

    Datsun redi-Go:डॅटसन रेडी गो भारतीय रस्त्यांवर तितकी दिसत नाही. पण गाडीची वैशिष्ट्य ग्राहकांना आकर्षित करतात. ही गाडी सहा व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. एएमटी १.० टी हा चांगला पर्याय असून पाच लाखांपेक्षा कमी (एक्स शोरूम) किंमतीत आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असल्याने रहदारीच्या रस्त्यांसाठी म्हणजे शहरातील ग्राहकांसाठी चांगला पर्याय आहे. (Photo- Datsun)

  • 4/12

    Renault Kwid:क्विड हे रेनॉल्टचं भारतातील यशस्वी मॉडेल आहे. कमी किंमत असल्याने ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. या गाडीत पाच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स उपलब्ध आहे. Kwid RXL ची किंमत फक्त ५ लाख रुपये आहे. तर Climber AMT Opt DT व्हेरियंटची किंमत सुमारे ५.८० लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. (Photo- Renault)

  • 5/12

    Maruti Suzuki S-Presso:एस प्रेस्सो १.० लिटर इंजिनद्वारे समर्थित असून ६८ एचपी उत्पादन करते आणि पाच-स्पीड ऑटोमॅटिक गिअर देखील आहेत. शहरी रस्त्यांसाठी ही गाडी एक उत्तम पर्याय बनतो. एस प्रेस्सो VXI AT ची किंमत सुमारे ५.५ लाख रुपये (एक्स शोरूम), VXI Plus AT प्रकारासाठी ५.२१ लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. (Photo- Maruti Suzuki)

  • 6/12

    Hyundai Santro:नविन सँट्रो ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. १.१ लिटर पेट्रोल इंजिनसह जोडलेले असून ६९ एचपीचे उत्पादन करते. Magna AMT सुमारे ५.८० लाख रुपयांपासून (एक्स शोरूम) सुरू होते आणि Asta AMT साठी किंमत ६.५० लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरूम) जाते. (Photo- Hyundai)

  • 7/12

    Maruti Suzuki WagonR:वॅगनआर ही देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या भारतीय कारपैकी एक आहे. ही गाडी पाच-स्पीड AMT युनिटसह सुसज्ज करणे ही एक योग्य पाऊल होतं. WagonR चे स्वयंचलित प्रकार सुमारे ६ लाख रुपये (एक्स शोरूम) पासून सुरू होते आणि ६.२५ लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरूम) जाते. (Photo- Maruti Suzuki)

  • 8/12

    Maruti Celerio:अद्ययावत Celerio ही गाडी नोव्हेंबर २०२१ मध्ये देशात लॉन्च करण्यात आली होती. भारतातील सर्वात इंधन-कार्यक्षम पेट्रोल कार असल्याचा दावा केला जातो. Celerio AMT ची किंमत ६.१५ लाख रुपयांपासून (एक्स शोरूम) सुरू होते. (Photo- Maruti Suzuki)

  • 9/12

    Datsun Go: ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेली डॅटसन गो ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. AMT पेक्षा CVT ट्रान्समिशन गीअर शिफ्ट चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करते. Datsun Go ऑटोमॅटिक्सची किंमत ६.३० लाख रुपये आणि ६.५० लाख रुपये (एक्स शोरूम) दरम्यान आहे. (Photo- Datsun)

  • 10/12

    Tata Tiago:टाटा मोटर्समधील Tiago आतापर्यंत नमूद केलेल्या मॉडेल्सपेक्षा थोडे अधिक सक्षम असून १.२ लिटर इंजिनमधून थोडी अधिक उर्जा देते. इंजिनला पाच-स्पीड AMT गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. XTA AMT, XZA AMT आणि XZA AMT असे Tiago चे तीन स्वयंचलित प्रकार आहेत. किंमत ६.३० लाख आणि ७.२० लाख रुपये (एक्स शोरूम) दरम्यान आहे. (Photo- Tata Motors)

  • 11/12

    Maruti Suzuki Ignis:इग्निसला भारतीय कार बाजारपेठेत तिच्या आकर्षक ड्राईव्ह आणि कॉम्पॅक्ट स्टायलिश लुकमुळे चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतील बाजूस अनेक फिचर्स आहेत. जर तुम्हाला पाच-स्पीड AMTत्याच्या १.२ लिटर इंजिनशी जोडलेले व्हेरिएंट विकत घ्यायचे असेल, तर तुम्ही ६.५० लाख आणि ७.६० लाख पर्यंत घेऊ शकता. (Photo- Maruti Suzuki)

  • 12/12

    Renault Triber: या यादीतील ट्रायबर हे एकमेव तीन पंक्ती वाहन आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये येथे लॉन्च झाल्यापासून देशात प्रचंड वेगाने विक्री झाली आहे. ट्रायबर ७२ एचपी उत्पादक १.० लिटर पेट्रोल इंजिनसह येते. पाच-स्पीड AMT शी जोडलेले आहे. RXT EASY-R AMT ची किंमत ७.५० लाख रुपये (एक्स शोरूम) पासून सुरू होते आणि सुमारे ८.२५ लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरूम) पर्यंत जाते. (Photo- Renault)

TOPICS
ऑटो न्यूजAuto News

Web Title: Top ten budget automatic transmission car in india rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.