• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. jaya ekadashi 2022 jaya ekadashi date muhurta importance and significance magh shukla ekadashi scsm

Jaya Ekadashi 2022: जाणून घ्या, जया एकादशी पूजाविधी, मुहूर्त आणि महत्त्व

धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशीचे व्रत केल्याने माणसाला मुक्ती मिळते, पाप-कष्टापासून मुक्ती मिळते, तसेच जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर होतात.

February 12, 2022 11:38 IST
Follow Us

श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने माघी यात्रा जया एकादशी निमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फुलाची आरास करण्यात आली आहे.

  • माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी साजरी केली जाते, त्या एकादशीला जया एकादशी म्हणतात. जया एकादशीला व्रत आणि पूजेला विशेष महत्त्व आहे. (photo credit: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढपूर)
    1/13

    माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी साजरी केली जाते, त्या एकादशीला जया एकादशी म्हणतात. जया एकादशीला व्रत आणि पूजेला विशेष महत्त्व आहे.
    (photo credit: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढपूर)

  • 2/13

    हिंदू धर्मात प्रत्येक व्रताला विशेष महत्त्व आहे, या यादीत एकादशी व्रताचा समावेश आहे. (photo credit: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढपूर)

  • 3/13

    जया एकादशीला भक्त विशेषत: भगवान विष्णू आणि श्री कृष्णाची पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशीचे व्रत केल्याने माणसाला मुक्ती मिळते, पाप-कष्टापासून मुक्ती मिळते, तसेच जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर होतात. (photo credit: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढपूर)

  • 4/13

    हिंदू कॅलेंडरनुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भाविक जया एकादशीचे व्रत करतात. (photo credit: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढपूर)

  • 5/13

    हे व्रत नियमाने केले तर जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते. या दिवशी पूजेच्या वेळी जया एकादशी व्रत कथेचे विशेष पठण केले जाते. (photo credit: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढपूर)

  • 6/13

    माघ शुक्ल एकादशी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ०१:५२ पासून सुरू होत आहे, जी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ०४:२७ वाजे पर्यंत चालणार आहे. (photo credit: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढपूर)

  • 7/13

    भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्याने जया एकादशी व्रताचे आचरण शनिवार, १२ फेब्रुवारी २०२२ रोजी करावे, असे सांगितले जाते. (photo credit: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढपूर)

  • 8/13

    ज्यांना हे व्रत करायचे आहे, त्यांनी दशमीच्या तारखेपासून उपवासाच्या नियमांचे पालन सुरू केले पाहिजे. नियमांनुसार दशमीच्या रात्री उपवास ठेवणाऱ्यांनी सात्विक भोजन करावे. (photo credit: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढपूर)

  • 9/13

    भगवान विष्णूचे ध्यान करून व्रताचा संकल्प सोडवा आणि नंतर भक्तिभावाने आणि प्रेमाने त्याला धूप, दीप, चंदन, फळ, तीळ आणि पंचामृत अर्पण करावे. (photo credit: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढपूर)

  • 10/13

    दिवसभर उपवास ठेवावा. रात्री फलाहार करू शकता. पण फक्त गोड फळे खावीत. शक्य असल्यास रात्रभर भजन कीर्तन करुन जागरण करावे. (photo credit: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढपूर)

  • 11/13

    प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षांतील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधिली जाते. विष्णूची अत्यंत प्रिय तिथी, अशी तिची प्रसिध्दी आहे. (photo credit: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढपूर)

  • 12/13

    एकादशीच्या दिवशी आंघोळ केल्यावर पूजेच्या ठिकाणी स्वच्छता केल्यानंतर तिथे गंगेचे पाणी शिंपडावे. (photo credit: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढपूर)

  • 13/13

    जया एकादशीच्या व्रताने दुःख, दारिद्र्य दूर होऊन धनलाभ, संपन्नता, समृद्धी प्राप्त होते, असे म्हटले जाते.(photo credit: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढपूर)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Jaya ekadashi 2022 jaya ekadashi date muhurta importance and significance magh shukla ekadashi scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.