-
उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी चेहरा स्वच्छ धुणे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही साधं पाणी किंवा प्रोडक्ट्सचा वापर करून चेहरा धुत असाल. तुम्ही कधी तुरटीच्या पाण्याचा वापर कधी केलाय का? यामुळे होणारे फायदे इथे जाणून घ्या…
-
अशा पद्धतीने बनवा तुरटीचं पाणी: चेहरा धुण्यासाठी तुम्ही तुरटीच्या पाण्याचा वापर करू शकता. तुरटीचं पाणी बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात तुरटी जवळपास ३ तास भिजत ठेवा. त्यानंतर नॉर्मल पाण्यात हे पाणी मिसळवून चेहरा धुवून घ्या. (Source: You Tube)
-
तेलकट त्वचा: अनेकजण तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहेत. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावरील पोर्समध्ये घाणीचे कण जमा होऊन चेहऱ्यावर पि्ंपल्ससारखे समस्या उद्भवतात. अशा लोकांसाठी सुद्धा तुरटीचं पाणी उत्तम पर्याय ठरेल. अशा लोकांनी दिवसातून एकदा तरी तुरटीच्या पाण्याने चेहरा धुवावे.
-
पिगमेंटेशन : स्कीनवर होणारे पिगमेंटेशनमुळे पूर्ण लूकच खराब होऊन जातो. तुरटीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे पिगमेंटेशम कमी होण्यास मदत होते. दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुरटीच्या पाण्याने चेहरा धुवावा.
-
टॅनिंग : कडक उन्हाच्या प्रकाशामुळेच नव्हे तर वातावरणातील उष्णतेमुळे सुद्धा त्वचा काळवंटते. टॅनिंग कमी करायचं असेल तर तुरटीच्या पाण्याच्या मदतीने तुम्ही त्वचेवरील टॅन काढू शकता. तुरटीच्या पाण्यात एक कापसाचा बोळा भिजवून चेहऱ्यावर टॅप करा. काही वेळानंतर चेहरा धुवून काढा.
-
फंगल इन्फेक्शनमध्ये सर्वात गुणकारी औषध म्हणजे तुरटी. तुरटीचं पाणी इन्फेक्शन झालेल्या जागी लावावं ते पुसून टाकू नये. आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवावी.
त्वचेवर पाण्याचा अशा पद्धतीने वापर करा, हे फायदे मिळतील
उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी चेहरा स्वच्छ धुणे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही साधं पाणी किंवा प्रोडक्ट्सचा वापर करून चेहरा धुत असाल.
Web Title: Use alum water in your skin care routine and get these benefits in hindi prp