-
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी ही भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणून साजरी केली जाते. आणि यावेळी अष्टमी तिथी १८ ऑगस्ट रोजी रात्री ९.२० वाजता सुरू होईल आणि १९ रोजी रात्री १०.५८ पर्यंत चालेल.(फोटो: संग्रहित फोटो)
-
भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता, त्यामुळे १८ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे.(फोटो: संग्रहित फोटो)
-
जन्माष्टमीच्या दिवशी पूजा करताना भगवान श्रीकृष्णाला आपल्या आवडत्या वस्तू अर्पण करून विशेष आशीर्वाद मिळतात. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगूया कोणत्या आहेत त्या ५गोष्टी, ज्यांचा जन्माष्टमीच्या पूजेत समावेश करायला हवा.(फोटो: संग्रहित फोटो)
-
माखन आणि साखरेची मिठाई भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय आहेत आणि अनेक पुराणांमध्ये असे सांगितले गेले आहे की श्रीकृष्ण लहानपणी लोणी आणि साखरेची मिठाई चोरत असे.(फोटो: संग्रहित फोटो)
-
म्हणून जन्माष्टमीच्या पूजेमध्ये भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि साखरेचा प्रसाद अर्पण करा.(फोटो: प्रातिनिधिक फोटो)
-
भगवान श्रीकृष्णाला मोरपंख खूप प्रिय आहे आणि त्यांच्या मुकुटात मोरपंख देखील आहे. असे मानले जाते की लाडू गोपाळांना मोराची पिसे अर्पण केल्याने विशेष आशीर्वाद मिळतात. असेही मानले जाते की मोराचे पंख नकारात्मकता दूर करतात तसंच मोरपंख घरात ठेवणे देखील खूप फायदेशीर आहे.(फोटो: प्रातिनिधिक फोटो)
-
जन्माष्टमीच्या दिवशी पूजेत सुंठवडा प्रसाद अवश्य समाविष्ट करा, कारण सुंठवडा भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे. सुंठवडा धनेपासून बनविला जातो.(फोटो: प्रातिनिधिक फोटो)
-
भगवान श्रीकृष्ण बासरीसह सर्वत्र दिसतात आणि ही त्यांची सर्वात आवडती वस्तू आहे. मान्यतेनुसार, जन्माष्टमीच्या पूजेत लाडू गोपाळांना बासरी ठेवल्याने विशेष आशीर्वाद मिळतात.(फोटो: संग्रहित फोटो)
-
पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहानपणापासून गायींची सेवा करत असत आणि त्यांना गोमातेची विशेष ओढ होती. त्यामुळे जन्माष्टमीच्या पूजेमध्ये गौमातेची मूर्ती ठेवता येते किंवा गायीला प्रसाद देता येतो.(फोटो: प्रातिनिधिक फोटो)
Janmashtami 2022: ‘या’ पाच गोष्टी भगवान श्रीकृष्णाला खूप आवडतात; जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून पूजेमध्ये करा यांचा वापर
Lord Krishna favourite thing for Janmashtami Puja: श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी ही भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणून साजरी केली जाते.
Web Title: Lord krishna favourite thing for janmashtami puja gps