-
प्रत्येक ऋतूत आरोग्याबरोबरच त्वचेची आणि केसांचीही काळजी घेणे गरजेचे असते. ऋतू बदलत असताना चेहऱ्यावर पुरळ आणि पिंपल्सची समस्या वाढते.
-
त्यातच आता दिवाळी हा सणही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावेळी प्रत्येक मुलीला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं.
-
आज आपण घरच्या घरी बनवता येण्यासाख्या काही खास फेसपॅकबद्दल जाणून घेऊया, जे तुमच्या चेहऱ्याची चमक वाढवतील तसेच त्वचेला उष्णतेपासून आराम देतील.
-
दही आणि बेसनाचा फेस पॅक त्वचेला आराम देतो. हा पॅक बनवण्यासाठी दोन चमचे बेसन थोड्याशा दह्यात मिसळून चांगले फेटून घ्या.
-
हा पॅक चेहऱ्यावर लावून कोरडे होईपर्यंत ठेवा. कोरडे झाल्यानंतर हा पॅक सामान्य पाण्याने धुवा. दही तुमच्या चेहऱ्याला हायड्रेट करेल आणि बेसन चेहऱ्याची चमक वाढवेल.
-
मुलतानी माती आणि गुलाबजल एकत्र करून पॅक तयार करा. पॅक चेहऱ्यावर लावून तो कोरडा होऊ द्या.
-
पॅक सुकल्यावर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. मुलतानी माती आणि गुलाबपाणी दोन्ही तुमच्या चेहऱ्याला थंडावा देतील. त्याचबरोबर चेहऱ्याला चमक येईल.
-
तुम्हाला माहिती आहे का की चटणी बनवण्याव्यतिरिक्त फेस पॅक तयार करण्यासाठीही पुदिन्याचा वापर केला जाऊ शकतो.
-
पुदिन्याचा फेस पॅक तुमच्या चेहऱ्याला थंडावा देतो तसेच त्वचेचा रंग उजळतो.
-
पुदिन्याची पाने बारीक करून चेहऱ्यावर लावा. पॅक सुकल्यावर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. हा पॅक लावल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटेल.
-
चंदनाचा प्रभाव थंड असतो. चंदनात थोडेसे गुलाबजल मिसळून पॅक तयार करा, तो पॅक चेहऱ्यावर लावा.
-
पॅक लावल्यानंतर काही वेळ न बोलता शांत बसा. पॅक सुकल्यावर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. या उपायाने त्वचेला थंडावा मिळेल आणि चेहरा उजळ दिसेल.
-
गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून काही वेळ कच्च्या दुधात भिजवा. त्यानंतर चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होईपर्यंत राहू द्या.
-
हा पॅक सुकल्यानंतर चेहरा सामान्य पाण्याने स्वच्छ धुवा. हा पॅक लावल्याने तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : Pexels)
Diwali 2022: दिवाळीत सुंदर दिसायचं आहे, पण पार्लरला जायला वेळ नाही? घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास फेस पॅक
आता दिवाळी हा सणही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावेळी प्रत्येक मुलीला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं.
Web Title: Want to look beautiful on diwali but dont have time to visit the parlour make this easy and special face pack at home remedies pvp