• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. lunar eclipse on november 8 will increase the tension of these zodiac signs an inauspicious yoga may cause financial loss pvp

Photos : ८ नोव्हेंबरला होणारे चंद्रग्रहण वाढवणार ‘या’ राशींची चिंता; अशुभ योगामुळे होऊ शकते आर्थिक नुकसान

हे चंद्रग्रहण भारतासह, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, रशिया, चीन, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि जपान या देशांमध्ये दिसेल.

November 1, 2022 16:14 IST
Follow Us
  • lunar eclipse inauspicious for four zodiac signs
    1/15

    २५ ऑक्टोबरला यावर्षातील दुसरे सूर्यग्रहण झाले. त्याच्याच मागोमाग आता यावर्षातील दुसरे चंद्रग्रहण होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हे चंद्रग्रहण अशुभ मानले जात आहे. (Pexels)

  • 2/15

    ८ नोव्हेंबर २०२२ या दिवशी यावर्षात शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. (Pixabay)

  • 3/15

    या चंद्रग्रहणाचा सर्व राशींवर परिणाम होणार असला तरीही चार राशींच्या लोकांना या काळात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. (Pexels/Indian Express)

  • 4/15

    हे चंद्रग्रहण दुपारी २ वाजून ३९ मिनिटांनी वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी संपेल. चंद्रग्रहणाच्या नऊ तासांआधी सुतक काळ सुरु होतो. (Pexels)

  • 5/15

    हे चंद्रग्रहण भारतासह, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, रशिया, चीन, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि जपान या देशांमध्ये दिसेल. (Pexels)

  • 6/15

    जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण होते. या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कोणत्या राशींसाठी नुकसानदायक ठरू शकते ते जाणून घेऊया. (Pexels)

  • 7/15

    या काळात मीन राशीच्या लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची संभावना आहे. (File)

  • 8/15

    तसेच धनहानी होण्याचीही शक्यता आहे. म्हणूनच या काळात अनावश्यक खर्च टाळावा. (Pexels)

  • 9/15

    हे चंद्रग्रहण कन्या राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या नुकसानदायक ठरू शकते. या काळात आहार आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. (File)

  • 10/15

    काही महत्त्वाची कामे रखडू शकतात. तसेच, या काळात जोडीदाराबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. (Pexels)

  • 11/15

    ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीमध्येच हे चंद्रग्रहण होणार असल्याने या राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण कष्टकरी ठरू शकते. या कालावधीत व्यवसायात कोणताही नवा करार करताना काळजी घ्यावी. (File)

  • 12/15

    अपघाताचे योग तयार होत असल्याने वाहन चालवताना सावध राहावे. तसेच या काळात मनात एखादी चिंता असू शकते. (Pexels)

  • 13/15

    वृषभ राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण नुकसानदायक सिद्ध होऊ शकते. (File)

  • 14/15

    व्यवहार करताना काळजी घ्यावी. अन्यथा नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर मतभेद होऊ शकतात. (Pexels)

  • 15/15

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Pexels)

TOPICS
चंद्र ग्रहण २०२४Lunar Eclipse 2024

Web Title: Lunar eclipse on november 8 will increase the tension of these zodiac signs an inauspicious yoga may cause financial loss pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.