-
नाते टिकवून ठेवण्यासाठी लोक भरपूर प्रयत्न करतात, मात्र कधीकधी प्रयत्न केले तरी नाते तुटतेच. मात्र, चूक कळल्यावर लोक जुन्या नात्याला पुन्हा जोडण्याचे प्रयत्न करतात. (source – pexels)
-
अशात तुम्ही जर आपल्या पूर्व जोडीदाराला संधी देण्याचा विचार करत असाल तर पुढील बाबी तुम्हाला योग्य निर्णय घेण्यात मदत करू शकतात. (source – pexels)
-
नाते तोडण्याचे कारण : नाते पुन्हा जोडण्यापूर्वी ते तुटण्याच्या कारणावर चर्चा करायचे विसरू नका. कारणावर चर्चा करून ते संपुष्टात न आणल्यास परत त्याच कारणावरून संबंध तुटू शकतात. (source – pexels)
-
भावना तपासा : ब्रेकअप नंतर अनेक लोक आयुष्यात पुढे जातात. जुना जोडीदार परत आल्यावर नाते पुन्हा जोडल्या जाते. मात्र, काहींना मनापासून हे नाते निभवणे शक्य होत नाही. (source – pexels)
-
म्हणून जुन्या जोडीदाराला संधी देण्यापूर्वी तुमच्या भावना काय आहेत त्या तपासा. जुन्या जोडीदाराविषयी प्रेम असल्यावरच नाते पुढे न्या. (source – pexels)
-
परत येण्याचे कारण जाणून घ्या – नाते तोडल्यानंतर परत येण्यामागे कोणते न कोणते कारण असेलच. (source – pexels)
-
परत नाते जोडण्यामागे जुन्या जोडीदाराचा काय हेतू आहे तो जाणून घ्या. चुकीचा हेतू असेल तर नात्यापासून दूर राहा. (source – pexels)
-
उणिवांना स्वीकारा : परस्परांतील उणिवांबाबत एकमेकांशी चर्चा करा. उणिवा स्वीकारून पुढे जाण्याची सहमती असल्यास नाते पुन्हा जोडण्याचा विचार करा. (source – pexels)
-
चेहऱ्यावरून ओळखा : कधीकधी चेहऱ्यावरील भावही जोडीदाराविषयी तुम्हाला माहिती देऊ शकतात. खरेच नाते जोडायचे असेल तर त्याचे प्रयत्न त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून दिसून येतील. (source – pexels)
आयुष्यात जुन्या जोडीदाराची पुन्हा एन्ट्री? संधी देण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची करा खात्री
नाते टिकवून ठेवण्यासाठी लोक भरपूर प्रयत्न करतात, मात्र कधीकधी प्रयत्न केले तरी नाते तुटतेच. मात्र, चूक कळल्यावर लोक जुन्या नात्याला पुन्हा जोडण्याचे प्रयत्न करतात.
Web Title: Follow this tips before giving second chance to ex partner ssb