Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. children of the countrys wealthiest families attended these schools and colleges you will also be shocked to know the fee pdb

Photos: Education of Richest Business Families: देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील मुले ‘या’ शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकली; फी जाणून तुम्हालाही बसेल धक्का!

Education of Richest Business Families: मुकेश अंबानीपासून गौतम अदानीपर्यंत, आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या कुटुंबीयांतील मुलांनी कोणत्या शाळांमध्ये शिक्षण घेतलंय आणि त्यांनी शाळेची फी किती रुपये भरली, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

November 18, 2022 14:23 IST
Follow Us
  • आकाश अंबानी: हा मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आहे, ज्याचा जगातील टॉप श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे. आकाश अंबानीने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. ही शाळा फक्त अंबानी कुटुंबाची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथे केजी ते इयत्ता ७ वी पर्यंतची फी १ लाख ७० हजार रुपये, ८ वी ते १० वी पर्यंतची फी १ लाख ८५ हजार रुपये आणि ८ वी ते १० वी पर्यंतची फी सुमारे ४ लाख ४८ हजार रुपये आहे. आकाश अंबानीने अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. त्याच्या फीबद्दल बोलायचे झाले तर, येथील एका वर्षाची फी ५० ते ५५ लाखांच्या दरम्यान आहे.आकाश अंबानी
    1/9


    आकाश अंबानी: हा मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आहे, ज्याचा जगातील टॉप श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे. आकाश अंबानीने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. ही शाळा फक्त अंबानी कुटुंबाची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथे केजी ते इयत्ता ७ वी पर्यंतची फी १ लाख ७० हजार रुपये, ८ वी ते १० वी पर्यंतची फी १ लाख ८५ हजार रुपये आणि ८ वी ते १० वी पर्यंतची फी सुमारे ४ लाख ४८ हजार रुपये आहे. आकाश अंबानीने अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. त्याच्या फीबद्दल बोलायचे झाले तर, येथील एका वर्षाची फी ५० ते ५५ लाखांच्या दरम्यान आहे.आकाश अंबानी

  • 2/9


    ईशा अंबानी: ही आकाश अंबानीची जुळी बहीण आहे. ईशा अंबानीने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर तिने येल विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली. पदवीनंतर ईशाने स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए केले. येले विद्यापीठाचे मानसशास्त्र विषयातील एक वर्षाचे शुल्क सुमारे ५० लाख रुपये आहे. आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात एमबीएची वार्षिक फी सुमारे ६२ लाख रुपये आहे.ईशा अंबानी

  • 3/9


    अनंत अंबानी: हे मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र आहेत. अनंत अंबानी यांनीही धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. येथील फी ५० ते ५५ लाखांच्या आसपास आहे. विषयानुसार, फी कमी किंवा जास्त देखील असू शकते.

  • 4/9


    करण अदानी: हा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचा मोठा मुलगा आहे. करण अदानी यांनी अमेरिकेच्या पर्ड्यू विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. येथील वार्षिक फी सुमारे ३७ लाख रुपये आहे.

  • 5/9

    जीत मित्तल: जीत हा करण अदानी यांचा धाकटा भाऊ आणि अदानी समूहाचा भाग आहे. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून त्यांनी स्कूल ऑफ इंजिनीअरिंग आणि अप्लाइड सायन्सेसमधून पदवी प्राप्त केली. येथे वार्षिक फी सुमारे ५५ ते ६० लाख रुपये आहे. (Photo: twitter)

  • 6/9


    आदित्य मित्तल: हे मित्तल कुटुंबातील आहेत, जे देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. आदित्य हा लक्ष्मी निवास मित्तल यांचा मुलगा आहे. त्यांनी जकार्ता इंटरनॅशनल स्कूलमधून हायस्कूल केले, त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. जकार्ता इंटरनॅशनल स्कूलची फी करोडोंमध्ये आहे.

  • 7/9

    अनन्या बिर्ला: अनन्या ही आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी आहे. त्यांनी युनायटेड किंगडमच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाची वार्षिक फी ४२ ते ५० लाख रुपये आहे.

  • 8/9

    केविन भारती मित्तल: हा भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी, Bharti Airtel चे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांचा मुलगा आहे. केविनने इंपिरियल कॉलेज, लंडन येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. ते जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे मोबाइल मेसेजिंग अॅप्लिकेशन हायक मेसेंजरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

  • 9/9

    ऋषद प्रेमजी: ऋषद प्रेमजी हे विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांचे मोठे पुत्र आहेत. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए आणि अमेरिकेच्या वेस्लेयन विद्यापीठातून अर्थशास्त्रात बी.ए. याशिवाय ऋषद प्रेमजी यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधूनही शिक्षण घेतले आहे. हार्वर्ड बिझनेस स्कूलची वार्षिक फी सुमारे ६० लाख रुपये आहे. दुसरीकडे, वेस्लेयन विद्यापीठाची वार्षिक फी ५१ लाख ते ५५ लाखांपर्यंत आहे. (Photos: jansatta)

TOPICS
मुकेश अंबानीMukesh Ambaniलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Children of the countrys wealthiest families attended these schools and colleges you will also be shocked to know the fee pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.