-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहू ग्रह नेहमी वक्री दिशेत मार्गिक्रमण करतो. ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला मायावी ग्रह म्हटले गेले आहे.
-
असेही म्हटले जाते की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू सकारात्मक स्थितीत असतो, ती व्यक्ती राजकारणात तसेच शेअर बाजारात चांगला फायदा मिळवू शकते. (Freepik)
-
२०२३ मध्ये राहू ग्रह मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर राहील. परंतु तीन राशींसाठी २०२३ मध्ये लाभ आणि प्रगतीचे योग तयार होत आहेत. या राशी कोणत्या आहेत ते पाहूया.
-
मिथुन : राहूचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण राहु ग्रह या राशीच्या कुंडलीच्या अकराव्या घरात प्रवेश करणार आहे. जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते.
-
म्हणूनच २०२३मध्ये या लोकांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच, यावेळी उत्पन्नाचे नवीन स्रोतही तयार होऊ शकतात. त्याचबरोबर जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो.
-
येणाऱ्या काळात शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही वेळ अनुकूल ठरू शकते.
-
येत्या वर्षभरात या लोकांच्या व्यवसायातही वाढ होण्याची संभावना आहे आणि या काळात त्यांचे कौटुंबिक जीवनदेखील आनंदी राहू शकते. त्याच वेळी, येणाऱ्या वर्षात बढती आणि प्रमोशन होण्याची शक्यता आहे. (Freepik)
-
कर्क : राहूचे राशी परिवर्तन या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. कारण हे संक्रमण कर्क राशीच्या दहाव्या घरात होणार आहे. ज्याला नोकरी आणि कामाची जागा समजली जाते.
-
म्हणूनच या वर्षी या राशीच्या लोकांना नवीन नोकरीसाठी चांगल्या ऑफर मिळू शकतात. तसेच, जर तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ चांगली ठरू शकते. (Pexels)
-
या वर्षी राहू ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या निर्माण होऊ शकतात.
-
या वर्षी तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी कनिष्ठ आणि वरिष्ठ दोघांचे सहकार्य मिळण्याची संभावना आहे. तसेच, तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. (Pexels)
-
कुंभ: राहुचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने चांगले सिद्ध होऊ शकते. कारण राहु ग्रह या राशीच्या संक्रमण कुंडलीच्या तिसऱ्या घरात असणार आहे. जे धैर्य आणि शौर्याचे घर मानले जाते.
-
यावेळी, तुमच्या धैर्यात आणि पराक्रमात वाढ दिसून येऊ शकते. जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला त्यात चांगला नफा मिळू शकतो. यावेळी भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.
-
कुंभ राशीचा स्वामी शनिदेव असून राहू आणि शनिदेव यांच्यात मैत्रीची भावना असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे हे संक्रमण कुंभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
२०२३ मध्ये राहू मीन राशीत होणार वक्री; ‘या’ राशींना विशेष आशीर्वादासह मिळू शकतात धनलाभाच्या मोठ्या संधी
२०२३ मध्ये राहू ग्रह मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे तीन राशींसाठी लाभ आणि प्रगतीचे योग तयार होत आहेत.
Web Title: Rahu will retrograde in pisces vakri meen rashi 2023 these zodiac signs can get great opportunities of wealth with special blessings pvp