• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. will the last week of november be auspicious or inauspicious for you see weekly horoscope pvp

Weekly Horoscope : नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा आठवडा तुमच्यासाठी शुभ असेल की अशुभ? पाहा साप्ताहिक राशीभविष्य

या आठवड्यात अनेक राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. मात्र काही राशींना यावेळी नुकसान होण्याचीही संभावना आहे.

November 27, 2022 10:56 IST
Follow Us
  • weekly horoscope November last week
    1/15

    उद्यापासून म्हणजेच २८ तारखेपासून नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात होत असून या आठवड्यात अनेक राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

  • 2/15

    मात्र काही राशींना यावेळी नुकसान होण्याचीही संभावना आहे. तुमच्या राशीसाठी येणार आठवडा कसा असेल, जाणून घेऊया.

  • 3/15

    मेष राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा चांगला जाऊ शकतो. यावेळी धनलाभाचे योग असल्याने फायदा होऊ शकतो. मात्र, या आठवड्यात प्रेमसंबंधांमध्ये कटुता येऊ शकते. खर्चही वाढू शकतात. या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्यावी.

  • 4/15

    वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात चढ-उतार अनुभवायला मिळू शकतात. खर्चाचे नियोजन करण्यासाठी बजेट तयार करणे फायद्याचे ठरू शकते. या आठवड्यात गुंतवणूक करणे टाळावे. तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. करिअर आणि व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात लहान-मोठ्या तक्रारी जाणवू शकतात.

  • 5/15

    मिथुन राशीच्या लोकांसाठी येणार आठवडा शुभ सिद्ध होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी हे दिवस शुभ ठरू शकतात मात्र विचारपूर्वक गुंतवणूक करावी. समाजातील प्रतिष्ठा वाढू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना शुभ वार्ता मिळू शकते. करिअर आणि व्यवसायात चढ-उतार पाहायला मिळू शकतो. मित्रांबरोबर फिरायला जाऊ शकता. जुना आजार बारा होऊ शकतो.

  • 6/15

    कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र परिणामांचा असू शकतो. व्यवसायातही मिश्र परिणाम मिळू शकतात. पोटासंबंधी तक्रारी जाणवू शकतात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर स्पर्धा होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा परिश्रमाचा ठरू शकतो. आर्थिक स्थितीतही चढ-उतार पाहायला मिळू शकतात.

  • 7/15

    सिंह राशीच्या लोकांसाठी येणार आठवडा शुभ ठरू शकतो. या आठवड्याच्या शेवटी प्रवासाचे योग बानू शकतात. समाजात मान वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी मोठे पद मिळण्याची संभावना आहे. कौटुंबिक वातावरण आणि जोडीदाराबरोबरचे संबंध चांगले राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होऊ शकते.

  • 8/15

    कन्या राशीच्या लोकांना काही गोष्टींमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळू शकतो. कौटुंबिक वेळ चांगला जाण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होऊ शकते. गुंतवणुकीसाठी ही वेळ चांगली सिद्ध होऊ शकते.

  • 9/15

    तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र परिणामांचा असू शकतो. व्यवहारामध्ये सावध राहावे. कामाच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते. विद्यार्थ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवन चांगले राहू शकते.

  • 10/15

    वृश्चिक राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची संभावना आहे. व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अडकलेले पैसे यावेळी मिळू शकतात. लग्नासाठी इच्छूक असणाऱ्यांना शुभ वार्ता मिळू शकते. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळू शकते.

  • 11/15

    धनु राशीसाठी हा आठवडा भाग्यदायी ठरू शकतो. जीवनसाथीचे सहकार्य मिळू शकते. लांबचा प्रवासही होऊ शकतो. दुखापत होण्याची संभावना असल्याने आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. मालमत्तेत गुंतवणूक केल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात उत्पन्नात वाढही होऊ शकते.

  • 12/15

    या आठवड्यात मकर राशीच्या लोकांच्या आरोग्यावर कोणताही मोठा परिणाम होणार नाही. या लोकांना या आठवड्यात संमिश्र परिणाम मिळू शकतात. वैवाहिक जीवन चांगले राहू शकते. करिअरच्या दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला ठरू शकतो. आर्थिक बाबतीत चढ-उतार पाहायला मिळू शकतात.

  • 13/15

    या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांचे कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. या आठवड्यात व्यवहारात सावधगिरी बाळगावी. मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. मित्रांसोबत वाद होऊ शकतो.

  • 14/15

    मीन राशीच्या लोकांनी अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नये. करिअर व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. वैवाहिक जीवन चांगले राहण्याची संभावना आहे.

  • 15/15

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscope

Web Title: Will the last week of november be auspicious or inauspicious for you see weekly horoscope pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.