-
मध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. औषधांबरोबरच अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्येही याचा आवर्जून वापर केला जातो.
-
आरोग्याबरोबरच त्वचेसाठीही मध उपयुक्त असल्याने अनेकजण याचा वापर आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये करतात.
-
मात्र त्वचेवर मध लावण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घेणेही तितकेच आवश्यक आहे. या गोष्टी कोणत्या आहेत ते आज आपण जाणून घेऊया.
-
मध लावण्याने आपली त्वचा स्वच्छ होत असली तरीही ते थेट त्वचेवर लावू नये.
-
त्वचेवर मध लावण्यापूर्वी त्यामध्ये गुलाबपाणी किंवा ऍलोव्हेरा जेल मिसळावे.
-
मध थेट त्वचेवर लावल्यास त्वचा चिकट होते.
-
त्वचेवर मध लावल्यानंतर केवळ २ ते ४ मिनिट मसाज करावा. जास्तवेळ मसाज करू नये.
-
त्वचेवर मध लावून जास्त काळ तसेच ठेवू नये. जास्तीत जास्त १५ ते २० मिनिट मध त्वचेवर ठेवावे.
-
यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करून कोरडी करावी.
-
चेहऱ्यावर मध लावल्यानंतर चेहरा स्वच्छ करण्यासाठी पाण्याचे तापमान योग्य आहे का याची काळजी घेणे आवश्यक आहे.
-
चेहऱ्यावरील मध स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. यामुळे मध त्वचेवरून सहज निघण्यास मदत होईल.
-
उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावलेले मध काढण्यासाठी थंड पाण्याचा वापर करू शकता.
-
त्याचप्रकारे मधाचा वापर केल्यानंतर चेहऱ्यावर टोनर अवश्य लावावे. तर यावेळी स्क्रबचा वापर करू नये.
-
तसेच मध लावल्यानंतर कडक उन्हात बाहेर पडू नये.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो: Freepik)
Photos: चेहरा उजळ बनवण्यासाठी मध लावताय? मग ‘या’ खबरदारी अवश्य घ्या
त्वचेवर मध लावण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घेणेही तितकेच आवश्यक आहे. या गोष्टी कोणत्या आहेत ते आज आपण जाणून घेऊया.
Web Title: Skin care tips applying honey to brighten the face then take some precautions pvp