• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. after december 29 all the wishes of these people can be fulfilled the transit of venus will give many good news in the new year pvp

Photos: २९ डिसेंबरनंतर पूर्ण होऊ शकतात ‘या’ लोकांच्या सर्व इच्छा; शुक्र संक्रमणामुळे नववर्ष मिळणार अनेक आनंदवार्ता

भौतिक सुखांचे दाता म्हटले जाणाऱ्या शुकरदेवांचे मकर राशीतील संक्रमण पाच राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार असल्याचे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे.

Updated: December 22, 2022 16:46 IST
Follow Us
  • Venus Transit Impact
    1/15

    या महिन्याच्या शेवटी शुक्रदेव शनिदेवच्या मकर राशीत प्रवेश करणार आहेत. २९ डिसेंबर होणाऱ्या या संक्रमाणामुळे अनेक राशींसाठी येणारे वर्ष समृद्धीचे ठरण्याची अपेक्षा आहे. भौतिक सुखांचे दाता म्हटले जाणाऱ्या शुकरदेवांचे मकर राशीतील संक्रमण पाच राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार असल्याचे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे.

  • 2/15

    शुक्र संक्रमणामुळे या राशींच्या लोकांना नोकरी आणि करियरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. शुक्रदेवाच्या प्रभावामुळे या राशींसाठी ही नववर्ष शुभ सिद्ध होऊ शकते. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

  • 3/15

    नवीन वर्ष सुरू होण्याच्या काही दिवस आधीच होणारे हे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे. यादरम्यान या लोकांना पैसे कामावण्याच्या अनेक संधी मिळतील. अनेक मोठ्या पदावरील लोकांशी संपर्क वाढून त्याचा भविष्यात फायदा होण्याचीही शक्यता आहे.

  • 4/15

    ज्या लोकांचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठीही हा काळ अतिशय चांगला सिद्ध होऊ शकतो. तसेच नोकरदारांनाही या काळात शुभ वार्ता मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या नवीन वर्ष फायदेशीर ठरू शकते. तसेच सहकार्यांची मदत मिळू शकते.

  • 5/15

    कन्या राशीच्या लोकांना येणाऱ्या वर्षात चांगले परिणाम मिळू शकतात. करियरमधील प्रगतीबरोबरच, व्यावसायिकांना लाभ मिळण्याची संभावना आहे. धार्मिक बाबींमधील रस वाढू शकतो.

  • 6/15

    येणाऱ्या वर्षात संचित धनामध्ये वाढ होण्याची संभावना आहे. जोडीदारसह चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. तसेच कुटुंबियांसाह जवळीक वाढण्याची शक्यता आहे.

  • 7/15

    शुक्र संक्रमणाच्या प्रभावामुळे तूळ राशीच्या लोकांच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. या लोकांच्या करिअरवर संक्रमणाचा सकारात्मक प्रभाव पाहायला मिळू शकतो. यामुळे येणाऱ्या वर्षात या लोकांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच, जोडीदाराबरोबरचे संबंधही सुधारू शकतात.

  • 8/15

    २०२३ मध्ये नोकरी बदलण्याच्या विचारात असणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. जोडीदारचे पूर्ण सहकार्य मिळू शकते. व्यावसायिकांचे व्यवहार निश्चित झाल्याने चांगला फायदा होऊ शकतो.

  • 9/15

    शुक्राचे संक्रमण मकर राशीत होईल आणि त्याच्या शुभ प्रभावामुळे नवीन वर्षात या लोकांची आर्थिक स्थिती खूप मजबूत होऊ शकते. करिअरचा हा टप्पा या लोकांसाठी प्रगतीशील ठरू शकतो आणि त्यांना चांगली बातमी मिळू शकते.

  • 10/15

    नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात मकर राशीचे लोक परदेशात जाण्याची योजना आखून अनावश्यक प्रवास खर्च टाळू शकता. कुटुंब आणि जोडीदाराशी संबंध सुधारण्याची शक्यता आहे.

  • 11/15

    आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ या लोकांसाठी चांगला राहू शकतो. कोणतीही जुनी शारीरिक समस्या दूर होऊ शकते.

  • 12/15

    शुक्राचे हे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात आणि प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांचे भागीदारांशी संबंध चांगले राहू शकतात.

  • 13/15

    त्याचबरोबर रखडलेली पैसे परत मिळाल्यानंतर काही कामे मार्गी लागू शकतात. या राशीचे लोक शारीरिकदृष्ट्या स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यास सक्षम असू शकतात.

  • 14/15

    येथे देण्यात आलेली माहिती गृहितके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

  • 15/15

    हेही पाहा: २०२३ सुरुवातीलाच शनिदेव तयार करणार ‘विपरीत राजयोग’; नववर्षात ‘या’ राशींचे चमकू शकते नशीब

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscope

Web Title: After december 29 all the wishes of these people can be fulfilled the transit of venus will give many good news in the new year pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.