-
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यदेव हे शनिदेवाचे पिता आहेत. पण दोघांमध्ये शत्रुत्वाची भावना आहे. म्हणजे या दोन ग्रहांचा संयोग जेव्हा कोणत्याही राशीत तयार होतो, तेव्हा ती घटना अत्यंत अशुभ मानली जाते आणि त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो.
-
१७ जानेवारीला शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर सूर्यदेवही १३ फेब्रुवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. या दोघांच्या कुंभ राशीतील संयोगामुळे अशुभ योग तयार होण्याची शक्यता आहे. तसेच तीन राशीच्या लोकांना या योगाच्या प्रभावाने सावध राहावे लागणार आहे. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
-
शनि आणि सूर्याचा संयोग कर्क राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकतो. कारण ही युती या राशीच्या संक्रमण कुंडलीच्या आठव्या घरात होणार आहे. अशा वेळी गाडी जपून चालवावी. कारण अपघाताची शक्यता निर्माण होऊ शकते.
-
या काळामध्ये व्यावसायिकांनी पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी. अन्यथा नुकसान होऊ शकते. तसेच, कामाच्या ठिकाणी कनिष्ठ किंवा वरिष्ठांशी संबंध बिघडू शकतात. त्यामुळे वादविवाद टाळावेत. आजारपणावर पैसा खर्च होऊ शकतो.
-
शनि आणि सूर्याची जोडी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी प्रतिकूल ठरू शकते. कारण ही युती या राशीच्या कुंडलीच्या चौथ्या घरात निर्माण होणार आहे. म्हणूनच यावेळी या लोकांनी त्यांच्या आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी.
-
यासोबतच यावेळी शनिदेवाची साडेसातीही सुरू असल्याने या लोकांना मानसिक त्रास संभवतो. कामात विलंब होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या योगाची दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडत असल्याने व्यवसायातील कोणताही करार अंतिम होणे थांबू शकते.
-
शनि आणि सूर्याचा संयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकतो. कारण या दोन ग्रहांचा संयोग या राशीच्या संक्रमण कुंडलीच्या लग्न घरामध्ये होणार असल्याने या लोकांचे आपल्या जीवनसाथीबरोबरचे नाते यावेळी बिघडू शकते.
-
दुसरीकडे, जे अविवाहित आहेत त्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. तसेच वडिलांशी मतभेद वाढू शकतात. नवीन काम करण्याचा विचार करत आहेत, त्यांनी आता थांबायला हवे. कारण ही वेळ अनुकूल नाही.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहितके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
२०२३ च्या पहिल्या महिन्यात सूर्यदेव आणि शनिदेव येणार आमने-सामने; ‘या’ तीन राशींच्या अडचणीत होऊ शकते मोठी वाढ
१७ जानेवारीला शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर सूर्यदेवही १३ फेब्रुवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत.
Web Title: In the first month of 2023 suryadev and shanidev will come face to face there can be a big increase in the difficulty of these three signs enemy planets pvp