-
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी उदय आणि अस्त होतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देश-जगावर होताना दिसतो. यासोबतच उगवत्या ग्रहांमुळे अनेक शुभ योगही बनतात.
-
शनिदेव ९ मार्चला उदय होत ‘अखंड साम्राज्य राजयोग’ तयार करणार आहेत. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल.
-
ज्योतिषशास्त्रानुसार अखंड साम्राज्य योग अत्यंत दुर्मिळ मानला जातो. हा योग अनेक परिस्थितींमध्ये तयार होतो.
-
या योगामुळे काही राशींना धनलाभ आणि त्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
-
मिथुन राशीच्या लोकांसाठी अखंड साम्राज्य राजयोग फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या राशीतून नवव्या घरात शनिदेवाचा उदय होणार आहे. त्यामुळे यावेळी तुमचे भाग्य चमकेल. यासोबतच अडकलेले काम यावेळी पूर्ण होऊ शकते.
-
दुसरीकडे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तसेच, तुम्ही या काळात नोकरी-व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
-
अखंड साम्राज्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण शनि ग्रह तुमच्या राशीतून तिसऱ्या भावात येईल. यावेळी शनिदेव बलवान असतात. त्यामुळे यावेळी तुमच्या धैर्यात आणि शौर्यामध्ये वाढ होईल. तसेच, या संक्रमणादरम्यान तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे.
-
या काळात तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. ही गुंतवणूक तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देऊ शकते. यासोबतच तुम्हाला भाऊ-बहिणीची साथ मिळेल. दुसरीकडे, ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे त्यांना यावेळी विशेष लाभ मिळू शकतो. त्याचबरोबर १७ जानेवारीपासून तुम्हाला साडेसातीपासून मुक्तीही मिळाली आहे.
-
अखंड साम्राज्य योगाची निर्मिती मकर राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीतून धनाच्या घरात उदय होणार आहेत. ज्याला पैसा आणि वाणीचे घर मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
-
त्याचवेळी, तुमच्या बोलण्याचा प्रभाव दिसून येईल. यासोबतच तुम्हाला कामाच्या ठिकाणी सन्मान मिळू शकतो आणि तुमची प्रशासकीय क्षमता वाढू शकते. तसेच, जे मीडिया, फिल्म लाइन आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करतात, त्यांच्यासाठी हा काळ चांगला असू शकतो.
-
( वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)
होळी संपताच ‘या’ राशींना होणार बलाढ्य धनलाभ? ‘अखंड साम्राज्य राजयोग’ बनल्याने मिळू शकतो बक्कळ पैसा
Akhand Samrajya Yoga In Kundli: ज्योतिषशास्त्रानुसार, ‘अखंड साम्राज्य योग’ अत्यंत दुर्मिळ मानला जातो. हा योग काही राशींच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतो, चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
Web Title: Akhand samrajya rajyog will make these zodiac signs rich with huge bank balance marathi astrology pdb