• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what should we do with dead persons identity proofs like aadhar card passport avn

मृत व्यक्तीच्या आधार कार्ड, पासपोर्ट इत्यादि ओळखपत्रांचं काय करायचं? त्यांचा गैरवापर टाळण्यासाठी हे वाचा

केवळ आधार किंवा पॅनच नव्हे तर अशी बरीच कागदपत्र आणि ओळखपत्रं असतात जी बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडतात

April 17, 2023 16:21 IST
Follow Us
  • aadharpandcardlink
    1/9

    सध्या आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करायची चर्चा सुरू आहे. मध्यंतरी 31 मार्च यासाठी शेवटची तारीख होती, पण आता पुन्हा यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे.

  • 2/9

    केवळ आधार किंवा पॅनच नव्हे तर अशी बरेच कागदपत्र आणि ओळखपत्रं असतात जी आपल्याला बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडतात. याच ओळखपत्रांवर आपला रोजचा कारभार सुरू असतो.

  • 3/9

    पण जर तुमच्या जवळची किंवा घरातील एखादी व्यक्तीचे निधन झाल्यास किंवा मृत पावल्यास त्या व्यक्तीच्या या महत्त्वाच्या कागदपत्रांचे आणि ओळखपत्रांचे नेमकं काय करायचं हे तुम्हाला ठाऊक आहे का?

  • 4/9

    एखादी व्यक्ती मृत असल्यास त्या व्यक्तीच्या ओळखपत्रांचा कोणत्याही मार्गाने गैरवापर होऊ नये यासाठी तुम्ही नेमकं काय करू शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • 5/9

    आज देशात कित्येकांकडे मतदानासाठी वेगळं असं वोटर आयडी असतं. एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचं वोटर कार्ड हे कोणाच्या हातात पडल्यास त्याचा मतदानासाठी गैरवापर केला जाऊ शकतो.

  • 6/9

    हे कार्ड रद्द करण्यासाठी तुम्हाला निवडूक कार्यालयात जाऊन फॉर्म-७ भरणं अनिवार्य असतं. त्यानंतरच ते मृत व्यक्तीचं कार्ड रद्द होतं यासाठी त्या व्यक्तिचा मृत्यूचा दाखलाही जोडावा लागतो.

  • 7/9

    पॅन कार्ड ही गोष्ट तर प्रत्येकाकडेच असते. तुमचं डीमॅट तसंच बँक खातं किंवा आयकर भरायची प्रक्रिया याच्याशिवाय होऊच शकत नाही. मृत व्यक्तीच्या वारसदाराला पॅन कार्ड रद्द करण्यासाठी अर्ज करावा लागतो, मात्र पॅन कार्ड रद्द करणं अनिवार्य नाही.

  • 8/9

    सध्या तुम्ही भारतीय असल्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे तुमच्याकडे असलेलं आधार कार्ड. एखाद्याच्या मृत्यू झाल्यास त्याचं आधार कार्ड रद्द करायची सोय सध्या तरी उपलब्ध नाही. पण त्या मृत व्यक्तीच्या आधार कार्डचा आणि फोन नंबरचा गैरवापर टाळण्यासाठी तुम्ही त्यांचे आधार कार्ड लॉक करू शकता. mAadhar किंवा UIDAI या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या संबंधीत व्यक्तीचे आधार कार्ड लॉक करू शकता.

  • 9/9

    आधारप्रमाणेच पासपोर्टही रद्द करायची काहीच प्रक्रिया सध्या उपलब्ध नाही. तो कालबाह्य झाल्यावर आपोआपच अवैध ठरतो, पण मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी तो जपून ठेवणं गरजेचं असतं. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
आधार कार्डAadhar Cardपॅन कार्डPan Cardमराठी बातम्याMarathi News

Web Title: What should we do with dead persons identity proofs like aadhar card passport avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.