-
देवांचा गुरु म्हणून बृहस्पति हा शुभ ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, देवांचा गुरु बृहस्पती जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या ज्ञान, बुद्धिमत्ता, शिक्षण, संतती, परोपकार, पिता-पुत्राचे नाते, सुख-समृद्धीवर दिसून येतो.
-
२२ एप्रिलला गुरुदेव स्वराशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश घेणार आहेत तर पाच दिवसांनी म्हणजेच २७ एप्रिलला गुरूचा उदय होणार आहे. मुख्य म्हणजे या काळात शनिदेव सुद्धा दशमी स्थानी शक्तिशाली असणार आहेत, त्यामुळे अनेक राजयोग सुद्धा तयार होत आहेत.
-
गुरु गोचर होणार असल्याने याचा काही राशींच्या लोकांना मोठा लाभ होऊ शकतो. या गोचरमुळे या राशींना त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..
-
गुरुदेव मुळात मेष राशीतच गोचर व उदित होणार असल्याने मेष राशीतील मंडळींना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठ्या नफ्याच्या नवीन संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना अपेक्षित पदोन्नती मिळू शकते.
-
तुमच्या कुंडलीत लग्न सुख आहे म्हणजेच तुम्हाला प्रेमाच्या माणसाची मोठी मदत मिळू शकते. जोडीदाराच्या रूपात लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो. तुम्ही एखादा लांबचा प्रवास करु शकता. हातात चांगला पैसा येऊ शकतो.
-
गुरूचा उदय मिथुन राशीतील मंडळीसाठी धन लाभाचे संकेत देणारे आहे. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना चांगली बातमी मिळू शकते. एकापेक्षा जास्त व्यवसायात गुंतवणूक करुन तुम्ही लाभ मिळवू शकता.
-
गुरूचा उदय तुमची आर्थिक बाजू मजबूत करु शकतो. मोठ्या कंपनीत काम करण्याची ऑफर मिळू शकते. अनेक स्थानिकांना परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. तुमच्या मेहनतीने तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करु शकाल.
-
सिंह राशीतील मंडळीसाठी गुरूचा उदय शुभ सिद्ध होऊ शकतो. गुरु प्रभावाने तुम्हाला आयुष्यातील सर्वात सुखाचा काळ अनुभवता येऊ शकतो. याकाळात तुमची आर्थिक प्रगती होऊ शकते. वडिलोपार्जित मालमत्तेतून भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे.
-
तुम्हाला येत्या काळात भावंडांच्या रूपात प्रचंड प्रेम व प्रगती अनुभवता येतील. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल ठरु शकते. तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव देखील मिळू शकतो.
-
कुंभ राशीत शनीची साडेसाती सुरु आहे पण कुंभ ही शनीची मूळ त्रिकोण रास आहे त्यामुळे कुंभ राशीस याकाळात लाभ अनुभवता येऊ शकतो. गुरुदेव तुम्हाला शांती अनुभवण्याची संधी देऊ शकतो. गुरु ग्रह तुम्हाला शीतल छाया अनुभवण्याची संधी देऊ शकतो.
-
व्यावसायिकांना उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळू शकतात, ज्यामुळे पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. तुम्हाला कामाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. दरम्यान, तुम्हाला प्रगतीच्या संधीही मिळू शकतात. तुमच्या गोड बोलण्याने इतरांवर चांगली छाप पडू शकते.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
अक्षय्य तृतीयेनंतर ५ दिवसांनी ‘या’ राशींचे सुरु होणार ‘अच्छे दिन’? देवगुरु उदय होताच मिळू शकतो वर्षभर बक्कळ पैसा
Guru Uday 2023: देवांचा गुरु म्हणून बृहस्पति हा शुभ ग्रह मानला जातो. गुरूचा मेष राशीत उदय होणार आहे. गुरुच्या उदयानं काही राशींना अच्छे दिन अनुभवता येऊ शकतात. कोणत्या राशींचे दिवस पालटतील ते पाहूया.
Web Title: Guru uday 2023 jupiter rise in aries good luck for the these zodiac signs rich give huge money bank balance pdb