-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह हे ठराविक वेळेनंतर राशी बदल करतात. मे महिन्यातील १० तारीख ही १२ राशींसाठी अत्यंत मोठे बदल घेऊन येणारी ठरू शकते.
-
या दिवशीच मंगळ ग्रह हा बुध ग्रहाच्या स्वामित्वाची रास म्हणजेच मिथुन मधून मार्गी होत चंद्राच्या स्वामित्वाची रास कर्क मध्ये प्रवेश घेणार आहे.
-
१ जुलै २०२३ पर्यंत मंगळ कर्क राशीत स्थिरावणार आहे आणि त्यानंतर सिंह राशीत प्रवेश करणार आहे. १० मे ला च बुध ग्रह सुद्धा उदयस्थितीत येणार आहे. यामुळे काही राशींसाठी माता लक्ष्मीच्या कृपेने संपत्ती आणि प्रगतीचा योग बनत आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..
-
मंगळ ग्रह गोचर होताच आपल्या व्यक्तिमत्वाला पराक्रम व साहसाचा साज चढू शकतो. आपल्या विरुद्ध उभी असणारी लोकं सुद्धा आपल्या बाजूने वळू शकतात. तुमच्या कुंडलीत प्रवासाचे योग दिसत आहेत.
-
सामाजिक क्षेत्रात मान वाढून तुमच्या खांद्यावर नव्या जबाबदाऱ्या येऊ शकतात. घरात एखादे शुभ कार्य होऊ शकते. या काळात भागीदारीतील कामे फायदेशीर ठरू शकतात.
-
मंगळ गोचर झाल्याने आपल्याला परदेश वारीचे योग दिसत आहेत, याचे मुख्य कारण म्हणजे मंगळ देव हे कर्क राशीत येताच आपल्या गोचर कुंडलीत अकराव्या स्थानी येणार आहेत, हे स्थान तुमच्या प्रगतीचे व स्थितीबदलाचे मानले जाते.
-
यासोबतच तुमच्या करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. या दरम्यान कामाच्या संदर्भात केलेले अनेक प्रवास तुमच्यासाठी खूप फलदायी ठरू शकतात. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.
-
मंगळ गोचर व बुध उदय हे कन्या राशीच्या आर्थिक प्रगतीला वेग देण्याचे काम करू शकतात. नोकरीच्या ठिकाणी आपली प्रशंसा होऊ शकते. कार्यालयातील तुमचे स्थान वाढेल आणि तुमचे अधिकार देखील वाढतील. तसेच भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकतो.
-
मित्रांसह नातं सुधारण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणुकीची सुरुवात करायची असल्यास आता एक मोठी संधी आपल्या दिशेने चालून येऊ शकते. आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढू शकतात.
-
शनीच्या स्वामित्वाच्या कुंभ राशीत बुध ग्रहाचा उदय अत्यंत प्रभावी ठरू शकतो. आपल्या कामाच्या कक्षा रुंदावू शकतात. नोकरीबदलाचे संकेत आहेत.
-
तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उत्कृष्ट असू शकते. तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
माता लक्ष्मीच्या कृपेने येत्या २४ तासांत ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? बुध अन् मंगळदेव नोकरीसह देऊ शकतात अपार धन श्रीमंती
Mangal Gochar and Budh Uday 2023: १० मे ला बुध ग्रह उदयस्थितीत येणार असून काही राशींना धन आणि प्रसिद्धी मिळण्याची दाट शक्यता आहे, पाहा तुमची रास आहे का यात?
Web Title: Mangal gochar 2023 and budh uday mangal gochar mars transit cancer rashi these zodiac signs rich give huge money bank balance pdb