-
स्वयंपाकघरासह रोज वापरल्या जाणाऱ्या भांड्यांची किंवा वस्तूंची स्वच्छता महत्त्वाची असते पण अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ शकते विशेषत: स्वयंपाकघरातील चाकू, विळी, सुऱ्या, मिक्सरची भांडी. स्वयंपाक करताना चाकू, विळी सुऱ्या, मिक्सरची भांडी खूप उपयोगी पडतात
-
भाजी चिरण्यासाठी, साल काढण्यासाठी, वाटण करण्यासाठी या वस्तूंचा आपण सर्रास वापर केला जातो. पण या वस्तूंची योग्य प्रकारे स्वच्छता केली जातेय का? याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. स्वयंपाकघरातील चाकू, सुऱ्या साफ करण्याची सुद्धा एक योग्य पद्धत आहे. या वस्तूंची योग्य स्वच्छता करणे आवश्यक आहे जेणेकरून ते योग्य प्रकारे कार्य करू शकतात. अन्यथा त्यांना गंज लागू शकतो किंवा त्यांची धार कमी शकता.
-
चाकू-सुऱ्या साफ करण्यासाठी कोणता सर्वोत्तम पर्याय कोणता?
तुम्हाला चाकू-सुऱ्या साफ करण्यासाठी कोणतेही महागडे उत्पादन वापरण्याची आवश्यकता नाही. यासाठी भांडी साफ करण्याचा साबण किंवा गरम पाणी असा साधा सोपा पर्याय वापरू शकता. हे चाकू- सुऱ्या साफ करण्याची सर्वात सोपा आणि उत्तम पर्याय आहे. -
स्वयंपाकघरातील चाकू सुऱ्या दीर्घकाळ वापरता यावे आणि त्यांची चांगली धार टिकविण्यासाठी चाकू वापरल्यानंतर ते योग्यरित्या स्वच्छ करणे आवश्यक आहे. चाकू व्यवस्थित साफ न केल्यास ते गंज लागू शकतात किंवा कापताना ते कुचकामी होऊ शकता
-
चाकू सुऱ्या अशा वस्तूंना गंज लागू नये या साठी कोणता पदार्थ वापरावा?
बाजारात उपलब्ध असलेले स्टेनलेस स्टीलचे चाकू हे गंजरोधक असू शकतात. पण त्यांची स्वच्छता राखणे आणि त्याची व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे आहे. काही विशिष्ट पदार्थांच्या संपर्कात आल्यानंतर स्वयंपाक घरातील चाकू-सुऱ्यांना गंज लागू शकतो. चाकू-सुऱ्यांना लागलेला गंज काढून टाकण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा पेस्ट किंवा लिंबाचा रस वापरू शकता. व्हिनेगरचे मिश्रण हे देखील चाकू-सुऱ्यांना गंज काढण्यासाठी वापरला जाऊ शकतो. बेकिंग सोडा, लिंबू किंवा व्हिनेगर हे असे पदार्थ आहेत जे स्वयंपाकघरात नेहमी वापरले जातात.pixel -
चाकू साफ करताना लक्षात ठेवा या सोप्या टिप्स
चाकू योग्य प्रकारे कसा साफ करावा याची पद्धत तुम्हाला आता माहित आहेत पण त्यासह काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवाव्यात. या टिप्स तुमचे चाकू स्वच्छ आणि चमकदार करतील आणि कापण्यासाठी कठोर वापर केल्यानंतरही प्रभावी राहतील याची खात्री करतील. -
त्वरित साफ करा- चाकू साफ करण्यासाठी खूप वेळ लावू नका. कारण खाद्यपदार्थ चिकटून राहिल्यास त्यांना गंज लागू शकतो. त्यामुळे काम झाल्यावर लगेचे चाकू साफ करा.
-
हाताने चाकू साफ करा- चाकू डिशवॉशरने स्वच्छ करण्यापेक्षा हाताने स्वच्छ करावे. हे कठोर क्निनिंग लिक्विड वापण्यामुळे त्यांची चमक कमी होते आणि चाकूला गंज लागू शकतो.
-
गंज काढून टाका- जर तुमच्या चाकूला गंज लागत असेल तर सोपे उपाय वापरून लगेच साफ करा
-
स्पंज वापरा – चाकू साफ करताना घासणी वापरण्याऐवजी स्पंजचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे चाकूची धार कमी होऊ शकते .
-
चाकू योग्य ठिकाणी ठेवा – चाकू साफ केल्यानंतर योग्य ठिकाणी ठेवले पाहिजे. चाकू कोरडा करूनच बाजूला ठेवा. एका वेगळ्या खान्यात किंवा लाकटी पेटीत चाकू ठेवा जेणेकरून ते दिर्घकाळ चांगले कार्य करू शकता.
-
त्यामुळे, तुमच्या भाज्यांसह इतर गोष्टी चिरण्याच्या आणि कापण्याच्या गरजांसाठी तुमचे चाकू चमकदार आणि चांगल्या आकारात ठेवा!
Kitchen Tips: स्वयंपाकघरातील चाकू-सुऱ्यांना गंज लागतोय? साफ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
स्वयंपाकघरातील चाकू सुऱ्या दीर्घकाळ वापरता यावे आणि त्यांची चांगली धार टिकविण्यासाठी चाकू वापरल्यानंतर ते योग्यरित्या स्वच्छ करणे आवश्यक आहे. चाकू व्यवस्थित साफ न केल्यास ते गंज लागू शकतात किंवा कापताना ते कुचकामी होऊ शकता
Web Title: Kitchen tips are kitchen knives rusting learn the proper cleaning method snk