-
गुडघेदुखी, पाठदुखी आणि गर्भधारणा अशा अनेक कारणांमुळे काहींना स्टूल किंवा शिडीवरून चढून सिलिंग फॅन साफ करणे जमत नाही. (photo- freepik)
-
फॅन साफ करण्यासाठी तुम्ही त्यासाठी खास तयार केलेल्या क्लिनिंग डस्टरचा वापर करा. (photo – unsplash)
-
यासाठी क्लिनिंग डस्टरच्या मदतीने आधी पाती साफ करुन घ्या. यावेळी घाईगडबडीत कोणताही पात तुटणार नाही किंवा वाकणार नाही याची काळजी घ्या. (photo – unsplash)
-
यानंतर एका आता एका बादलीत पाणी, अर्धा कप खोबरेल तेल, मीठ, थोडेसे व्हिनेगर आणि डिटर्जंट पावडर टाकून लिक्विड बनवा, ते डस्टरच्या मदतीने सर्व पातींवर फिरवा आणि अगदी आरामात स्वच्छ करा. (photo – unsplash)
-
व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीनेही तुम्ही फॅन साफ करू शकता. (photo – unsplash)
-
यासाठी व्हॅक्यूमचे हँडल पकडून फॅनच्या ब्लेडवर फिरवा. त्यावर ब्रश जोडण्यास विसरू नका जेणेकरून अडकलेली धूळ सहज निघून जाईल. (photo – unsplash)
-
घराच्या भिंतींवर जमा झालेले कोळ्यांचे जाळे आणि धूळ काढण्यासाठी डस्टिंग ब्रशचा वापर होता पण याच्या मदतीने तुम्ही पंखा देखील साफ करू शकता. (photo – unsplash)
-
२ महिन्यातून एकदा तरी घरातील सिलिंग फॅन साफ करणे आवश्यक आहे. नाही तर धूळ सतत खाली पडत राहते. (photo – unsplash)
स्टूल, शिडीचा वापर न करता सिलिंग फॅन ‘या’ पद्धतीने करा साफ; दिसेल अगदी चकाचक
अनेकांना टेबल आणि शिडीवर चढून सिलिंग फॅन साफ करणे जमत नाही. अशावेळी तुम्ही खालील टिप्स फॉलो करुन अगदी आरामात फॅन साफ करु शकता.
Web Title: Cleaning hacks how to clean dusty ceiling fan in few minutes sjr